सध्या इंडियन प्रीमिअर लीग 2023चा महासंग्राम दिमाखात पार पडत आहे. मात्र, यामध्येच मोठी बातमी समोर येत आहे. क्रिकेट जगतात पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगचे प्रकरण समोर आले आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाला मोठी माहिती दिली आहे. त्याने सांगितले आहे की, एका अनोळखी व्यक्तीने क्रिकेट सामन्यात मोठी रक्कम हारल्यामुळे त्याच्याकडे संघाच्या अंतर्गत माहितीसाठी संपर्क साधला होता.
माध्यमांतील वृत्तांनुसार, आयपीएल 2023 हंगामापूर्वी मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याला एका व्यक्तीने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान संपर्क साधला होता. हा व्यक्ती त्याच्याकडे संघातील अंतर्गत माहिती मागत होता. याबदल्यात त्याला मोठ्या रकमेचे आमिषही दाखवण्यात आले होते. आता कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे.
Mohammed Siraj has reported without any delay, to BCCI's Anti-Corruption Unit about a contact for gaining inside information during the recent ODI series between India-Australia
— Ramaswamy (@viswaguru1964) April 19, 2023
वृत्तांनुसार बीसीसीआयने पीटीआयला सांगितले की, “ज्या व्यक्तीने सिराजला संपर्क केला होता, तो सट्टेबाज नव्हता. तो सामन्यांवर सट्टा लावणारा हैदराबादचा एक ड्रायव्हर होता. त्याने बरेच पैसे गमावले होते. त्यामुळे त्याने अंतर्गत माहितीसाठी सिराजला संपर्क केला.” ते पुढे म्हणाले की, “सिराजने लगेच याची माहिती दिली. त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तसेच, त्याच्याकडून सविस्तर माहिती येण्याची प्रतीक्षा आहे.”
खरं तर, 10 वर्षांपूर्वी जेव्हा आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगचे प्रकरण समोर आले होते, तेव्हापासून बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने आपल्या मोहिमेची गती वाढवली आहे.
सन 2013मध्ये झालेल्या प्रकरणादरम्यान एस. श्रीसंत, अनिकेत चव्हाण आणि अजित चंडेला हे त्यावेळी राजस्थान रॉयल्स संघाचे खेळाडू होते. त्यांना स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांच्याव्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्सचे अधिकारी गुरुनाथ मयप्पन यांनाही मे 2013मध्ये सट्टेबाजीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
विशेष म्हणजे, खेळाडूंसाठी भ्रष्टाचार विरोधी शिबीर करणे गरजेचे आहे. तसेच, भ्रष्टाचारासाठी संपर्क साधल्यानंतर जे खेळाडू तक्रार करणार नाहीत, त्यांच्यावर बंदी घातली जाऊ शकते. (ipl 2023 pacer mohammed siraj approached for inside information bowler reports to bcci know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: अर्जुन तेंडुलकरचे खास अंदाजात पदार्पणाचे सेलिब्रेशन, मराठी गाण्यावर सहकाऱ्यांसोबत लावले ठुमके
ब्रेकिंग! दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारासह अनेक खेळाडूंच्या 16 बॅट चोरीला, इतर महागड्या वस्तूही गायब