आयपीएलच्या मैदानात भारतीय दिग्गज अजिंक्य रहाणे सध्या धमाकेदार प्रदर्शन करत आहे. सोमवारी (17 एप्रिल) बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर देखील रहाणेने आधी फलंदाजी आणि नंतर क्षेत्ररक्षकाच्या रूपात कमाल प्रदर्शन केले. रहाणेने ग्लेन मॅक्सवेलने षटकारासाठी मारलेला चेंडू चपळाईने अडवला आणि संघाच्या पाच धावाही वाचवल्या. सीएसकेने हा सामना 8 धावांनी आरसीबीला पराभूत केले.
आयपीएल 2023चा हा 24 वा सामना होता. एमएस धोनी याच्या नेतृत्वातील सीएसके आणि फाफ डू प्लेसिस याच्या नेतृत्वाती आरसीबी, हे दोन्ही संघ समोवारी (17 एप्रिल) धमाकेदार फलंदाजी करताना दिसले. सीएसकेसाठी डेवॉन कॉनवे (83), शिवम दुबे (52), आणि अजिंक्य रहाणे (37) यांनी महत्वाचे योगदान दिले. तर आरसीबीसाठी फाफ डू प्लेसिस (62) आणि ग्लेम मॅक्सवेल (76) यांनी महत्वाची खेळी केली. आरसीबीला विजयासाठी 227 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांना निर्धारित 20 षटकात हे लक्ष्य गाठता आले नाही. आरसीने 8 बाद 218 धावांपर्यंत मजल मारली.
आरसीबीच्या डावातील 9व्या षटकात रविंद्र जडेजा गोलंदाजी करत होता. षटकातील पाचव्या चेंडूवर मॅक्सवेलने मोठा शॉट खेळला, पण चेंडू जास्त लांब गेला नाही. खेळपट्टीवर उपस्थित मॅक्सवेल आणि डू प्लेसिस यांनी एक धाव घेतली, पण आरसीबीला षटकार मात्र अजिंक्य रहाणेने मिळू दिला नाही. नंतर रहाणेचे हेच क्षेत्रररक्षण आरसीबीच्या विजयात महत्वाचे ठरले, जेव्हा आरसीबीला विजयासाठी एक-एक धाव आवश्यक होती. रहाणेचा हा झेल पाहून चाहते सोशल मीडियावर त्याचे कौतुक करत आहेत.
Keeps his eyes 👀 on the ball
Times his jump to perfection ✅
Flicks the ball back before crossing the boundary line 👌Simply outstanding from @ajinkyarahane88 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/QZwZlNk1Tt #TATAIPL | #RCBvCSK
Watch 🔽 pic.twitter.com/n2bT0lv0Ed
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2023
दरम्यान, सीएसकेसाठी आयपीएल हंगामात तिसरा विजय ठरला, तर आरसीबीला हंगामातील तिसरा पराभव स्वीकारावा लागला. दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच-पाच सामने चालू आयपीएल हंगामात खेळले आहेत. गुणतालिकेत सीएसके तिसऱ्या, तर आरसीबी सातव्या क्रमांकावर आहे. आपल्या पाच सामन्यांपैकी चार सामने जिंकणारा राजस्थान रॉयल्स संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावरआ हे. तर दुसरा क्रमांक लखनऊ सुपर जायंट्सचा आहे, ज्यांनी पाच पैकी तीन सामने जिंकले आहेत. (Ajinkya Rahane fielded brilliantly)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फाफ अन् मॅक्सवेलचा भीमपराक्रम! विराट-राहुलला पछाडत आरसीबीसाठी रचला भागीदारीचा नवीन रेकॉर्ड
धोनीच्या ‘इम्पॅक्ट’ जाळ्यात फसला ‘किंग’ कोहली, पाहून पत्नी अनुष्काही शॉक; व्हिडिओ व्हायरल