चेन्नई सुपर किंग्स संघाने सोमवारी (दि. 17 एप्रिल) आयपीएल 2023च्या 24व्या सामन्यात 8 धावांनी शानदार विजय मिळवला. हा चेन्नईचा स्पर्धेतील तिसरा विजय होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्धच्या या विजयात शिवम दुबे यानेही सिंहाचा वाटा उचलला. त्याने 27 चेंडूत 52 धावांची वादळी खेळी करत संघाला 226 धावांपर्यंत पोहोचवण्यात मोलाचे योगदान दिले. त्याने क्रीझवर येताच चौकार-षटकारांचा पाऊस पाडला आणि बेंगलोरच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला. सामन्यानंतर दुबेने त्याच्या खेळीविषयी मोठे भाष्य केले.
काय म्हणाला दुबे?
शिवम दुबे (Shivam Dubey) याने चेन्नई सुपर किंग्स संघाचा डाव संपल्यानंतर मोठे विधान केले. तो म्हणाला की, “या स्टेडिअममध्ये, या खेळपट्टीवर आणि या गर्दीसमोर खेळणे माझ्यासाठी अद्भूत होते. मी आधीही म्हटले होते की, मी माझ्या ताकदीचे समर्थन करतो आणि आज याचीच गरज होती. निश्चितरीत्या माझा विश्वास आहे की, जेव्हाही मी पुढे जात असतो, तेव्हा मला रोखणे सोपे नसते. हाच माझा आणि संघाचा विश्वास आहे.”
5⃣0⃣ for @IamShivamDube in just 2⃣5⃣ balls! 💪 💪
This has been a stunning knock 👌👌
Follow the match ▶️ https://t.co/QZwZlNk1Tt#TATAIPL | #RCBvCSK pic.twitter.com/yXE7JWQVuE
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2023
योग्य क्षेत्रात गोलंदाजी करण्याची गरज
एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवरील खेळपट्टीविषयी विचारले असता, दुबे म्हणाला की, “मैदानाचा आकार आणि खेळपट्टी चांगली होती. मला जे स्वातंत्र्य मिळाले, मी त्याचा आनंद घेतला. कोणत्याही खेळपट्टीवर 226 धावा झाल्या पाहिजेत. मात्र, आम्हाला योग्य क्षेत्रात गोलंदाजी करण्याची गरज आहे. लहानपणापासूनच माझ्यात ही शक्ती आहे. माझ्या वडिलांनी मला आवश्यक प्रोटीन दिले आहे. कारण, त्यांना माहिती आहे की, या स्तरावर कोणत्या गोष्टीची गरज आहे.”
चेन्नईचा 8 धावांनी विजय
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकात 6 विकेट्स गमावत 226 धावा केल्या होत्या. यामध्ये दुबेच्या 27 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 52 धावांचा समावेश होता. तसेच, सलामीवीर डेवॉन कॉनवे याने 83 धावांची खेळी साकारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरला 20 षटकात 8 विकेट्स गमावत 218 धावाच करता आल्या. त्यामुळे चेन्नईने हा सामना 8 धावांनी जिंकला. (ipl 2023 rcb vs csk not easy to stop me all rounder shivam dubey reacts on his 52 run innings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नो-बॉलचा मारा करताच पंचांनी हर्षलला गोलंदाजी करण्यापासून का रोखले? ‘हे’ आहे कारण
आयपीएल 2023मधून मोठी बातमी! LSG vs CSK सामन्याच्या वेळापत्रकात बदल; जाणून घ्या कारण