जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले. आयपीएल 2023 मधील उद्घाटनाचा सामना गतविजेता गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्या दरम्यान 31 मार्च रोजी खेळला जाईल. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यासोबतच अंतिम सामना देखील याच मैदानावर 28 मे रोजी खेळला जाईल. आयपीएलच्या सोशल मीडिया हँडलवरून याबाबतची अधिकृत घोषणा केली गेली.
IPL 2023 schedule. pic.twitter.com/fvIt1oPWoC
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 17, 2023
आयपीएल 2023 चा पहिला सामना खेळण्याचा मान गत विजेत्या गुजरात टायटन्सने आपल्याच मैदानावर खेळण्याचा मिळवला. विशेष म्हणजे तब्बल तीन वर्षानंतर प्रत्येक संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळताना दिसेल. कोरोना महामारीमुळे 2020 चा संपूर्ण हंगाम संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळला गेला होता. 2021 चा हंगाम भारत व युएई तसेच 2022 हंगाम पूर्णपणे मुंबईत खेळला गेला होता. यावेळी प्रत्येक संघ घरच्या मैदानावर सात तर इतर संघांचा मैदानावर सात सामने खेळतील.
मागील वर्षी प्रमाणे यंदा देखील दहा संघांना दोन गटांमध्ये विभागले गेले आहे. मात्र, यावेळी एकाच गटातील संघ एकमेकांशी केवळ एकदाच खेळताना दिसतील. तर, दुसऱ्या गटातील संघांशी प्रत्येकी दोन सामने त्यांना खेळता येणार आहेत. जवळपास दोन महिन्यांच्या या स्पर्धेमध्ये एकूण 74 सामने खेळले जातील.
(IPL 2023 Schedule Out Gujrat Titans Face CSK In Opener)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुजाराचा शंभराव्या कसोटीबद्दल गावसकरांकडून खास सन्मान, व्हिडिओत दिसला भारतीय क्रिकेटचा इतिहास
नाणेफेकीचा कौल जिंकत ऑस्ट्रेलिया करणार बॅटिंग, टीम इंडियात ‘या’ पठ्ठ्याचे पुनरागमन