सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएल 2023 स्पर्धेतील 34वा सामना पार पडला. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर हा सामना खेळण्यात आला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने 7 धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र, या सामन्यापूर्वी लाखो क्रिकेटप्रेमींना एक शानदार दृश्य पाहायला मिळाले. झाले असे की, दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर हा भारतीय संघाचा अनुभवी आणि हैदराबादचा खेळाडू भुवनेश्वर कुमार याच्या पाया पडताना दिसला. दोन्ही खेळाडूंमधील हा क्षण क्रिकेटप्रेमींची मने जिंकून गेला.
डेविड वॉर्नर (David Warner) याने सामन्यापूर्वी भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याचे पाय पकडले, तेव्हा त्याने त्याला कडकडून मिठी मारली. दोन्ही खेळाडूंचा हा व्हिडिओ आयपीएलने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला चाहत्यांची तुफान पसंती मिळत आहे. व्हिडिओत दिसते की, वॉर्नर धावत धावत जातो आणि भुवनेश्वरचे पाय पकडतो. यानंतर भुवनेश्वर त्याला उठवून मिठी मारतो.
This visual is all 🧡 💙!
Follow the match ▶️ https://t.co/ia1GLIWu00#TATAIPL | #SRHvDC | @SunRisers | @DelhiCapitals | @BhuviOfficial | @davidwarner31 pic.twitter.com/t9nZ95dyJ7
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2023
दोघांनीही केलंय एकाच संघाचे प्रतिनिधित्व
झाले असे की, भुवनेश्वर कुमार आणि डेविड वॉर्नर (Bhuvneshwar Kumar And David Warner) हे दोघेही सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळले आहेत. वॉर्नरने माजी संघ हैदराबादला 2016च्या आयपीएल हंगामाचे विजेतेपद जिंकून दिले होते. त्यानंतर वॉर्नरला हैदराबादला 2020 आणि 2021मध्ये धावा करण्यात अपयश आले. त्यानंतर त्याला संघातील जागा गमवावी लागली. त्याला हैदराबाद संघ व्यवस्थापनाने बाहेर केले. मात्र, त्याने ऑस्ट्रेलियासाठी 2021 मध्ये टी20 विश्वचषक आणि 2022मध्ये आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघासाठी शानदार प्रदर्शनाने पुनरागमन केले.
दिल्ली कॅपिटल्सचे खराब प्रदर्शन
रिषभ पंत याच्या अनुपस्थितीत डेविड वॉर्नर दिल्लीची धुरा सांभाळत आहे. मात्र, दिल्लीची हंगामातील सुरुवात खराब कामगिरीने झाली. त्यांना पहिले सलग पाचही सामन्यात पराभव पत्करावा लागला. हंगामातील संघर्षानंतरही वॉर्नरचा अनुभव दिल्लीसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्याने आपल्या सहाव्या आणि हैदराबादविरुद्धच्या सातव्या सामन्यात दिल्लीला सलग दोन सामने जिंकून दिले आहेत. आता पुढील सामन्यांमध्येही दिल्ली संघ अशीच कामगिरी करतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (ipl 2023 skipper david warner touches bhuvneshwar kumar feet bhuvi hugs him see video here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सलग दुसऱ्या विजयानंतर वॉर्नरची ईशांत शर्माबद्दल मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘त्याने खूपच…’
दिल्लीच्या 5.50 कोटींच्या गोलंदाजाने राखली संघाची लाज! SRHच्या पारड्यात पराभवाची हॅट्रिक, वाचा सविस्तर