मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद, या दोन्ही संघांनी आयपीएलच्या चालू हंगामात प्रत्येकी चार-चार सामने खेळले आहेत. या चार पैकी दोन-दोन सामने दोन्ही संघांनी जिंकले आहेत. मंगळवारी (18 एप्रिल) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई आणि हैदराबाद संघ आमने सामने असणार आहेत. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा असेल. कारण आहे त्याचे यापूर्वी हैदराबादमध्ये केलेले चांगले प्रदर्शन. रोहित या सामन्यादरम्यान एक मोठी कामगिरी देखील करू शकतो.
मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians) आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये पहिल्यांदाच आमने सामने आले आहेत. हंगामातील 25व्या सामन्यात या दोन संघांमध्ये लढेत होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळळा जाणार असून रोहित शर्मा याठिकाणी मुंबई इंडियन्ससाठी महत्वपूर्ण धावा करू शकतो. हैदराबदच्या या स्टेडियममध्ये रोहितने आतापर्यंत 38.83च्या सरासरीने 466 आयपीएल धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 139.10 होता आणि चार अर्धशतके रोहितने याठिकाणी मारली आहेत.
रोहित शर्मा हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आयपीएल कारकिर्दीतील मोठा टप्पाही पार करू शकतो. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 231 सामन्यात 5986 धावा केल्या आहेत. मंगळवारी तो आपल्या 6000 आयपीएल धावा पूर्ण करू शकतो. यासाठी त्याला अवघ्या 14 धावांची आवश्यकता आहे. रोहित 30.23 सरासरी आणि 129.93च्या स्ट्राईक रेटने आयपीएलमध्ये आतापर्यंत धावा करत आला आहे.
दरम्यान, आयपीएल 2023च्या गुणतालिकेचा विचार केला, तर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबद अनुक्रमे आठ आणि नऊ क्रमांकावर आहेत. पहिल्या क्रमांकावर संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स आहे, ज्यांना पाच पैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे. दुसऱ्या क्रमांकावर केएल राहुलच्या नेतृत्वात लखनऊ सुपर जायंट्स आहे, ज्यांनी पाच पैकी तीन विजय मिळवले आहेत. एमएस धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज तिसऱ्या क्रमांकावर आहे. सीएसकेने देखील हंगामातील सुरुवातीच्या पाच पैकी तीन सामने जिंकले आहेत. (Captain needs 14 runs to complete 6000 runs in IPL )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फलंदाजीनंतर रहाणे क्षेत्ररक्षणातही चमकला, आरसीबीच्या पराभवास कारणीभूत ठरला ‘हा’ चेंडू
फाफ अन् मॅक्सवेलचा भीमपराक्रम! विराट-राहुलला पछाडत आरसीबीसाठी रचला भागीदारीचा नवीन रेकॉर्ड