आयपीएल 2023 चा 14 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला गेला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात यजमान संघाने उत्कृष्ट सांघिक कामगिरीचे दर्शन घडवले. गोलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर राहुल त्रिपाठी व कर्णधार एडेन मार्करम यांनी शानदार फलंदाजी करत संघाला 8 गडी राखून विजय मिळवून दिला. यासह हैदराबादचे गुणतालिकेतील खाते देखील खोलले गेले.
Match 14. Sunrisers Hyderabad Won by 8 Wicket(s) https://t.co/Di3djWhVcZ #TATAIPL #SRHvPBKS #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2023
पहिले दोन सामने गमावल्याने हैदराबादची या हंगामातील सुरुवात खराब झाली होती. तर, दुसरीकडे या सामन्यात पंजाब किंग्स विजयाची हॅट्रिक करण्याच्या इराद्याने मैदानात आले. मात्र, हंगामात प्रथमच हैदराबादच्या गोलंदाजांनी आपला दर्जा दाखवून दिला. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर संघाला यश मिळवून दिले. त्यानंतर मार्को जेन्सन व उमरान मलिकने प्रत्येकी दोन बळी मिळवले. बऱ्याच कालावधीनंतर आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उतरलेल्या लेगस्पिनर मयंक मार्कंडेने पंजाबच्या गोलंदाजांना फारशी हालचाल करू दिली नाही. त्याने 4 बळी मिळवत पंजाबची वाताहात केली. अखेरच्या विकेटसाठी शिखरने मोहित राठीसह 55 धावांची नाबाद भागीदारी करत संघाला 143 पर्यंत पोहोचवले. शिखरने अखेरपर्यंत नाबाद राहताना 66 चेंडूंवर 99 धावांची खेळी केली. यामध्ये 12 चौकार व 5 षटकारांचा समावेश होता.
विजयासाठी 144 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या हैदराबादला मयंक अगरवाल व हॅरी ब्रुक यांनी संयमी सुरुवात दिली. दोघे अनुक्रमे 21 व 13 धावा काढून परतल्यानंतर राहुल त्रिपाठी व ऐडन मार्करम यांनी नाबाद शतकी भागीदारी केली. दोघांनी खराब चेंडूंचा समाचार घेत संघाचा विजय साकार केला. त्रिपाठीने हंगामातील पहिले अर्धशतक साजरे करताना 48 चेंडूवर नाबाद 74 धावा केल्या. मार्करमने 37 धावांचे योगदान दिले. या विजयासह हैदराबादने आपला पहिला विजय साजरा केला.
(IPL 2023 Sunrisers Hyderabad Beat Punjab Kings By 8 Wickets Mayank Markandey Rahul Tripathi Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रत्नागिरी अरावली ॲरोजचा तिसरा विजय
ठाणे हम्पी हिरोज पुन्हा अव्वल स्थानी