---Advertisement---

अर्जुन अन् शुबमनचा सामना होताच नेटकऱ्यांनी सारा तेंडुलकरचे मीम्स केले व्हायरल, तुम्हीही पाहाच

On: बुधवार, एप्रिल 26, 2023 10:41 AM
Arjun-Tendulkar-And-Shubman-Gill
---Advertisement---

मंगळवारी (दि. 25 एप्रिल) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स संघात आयपीएल 2023चा 35वा सामना पार पडला. या महत्त्वाच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी गुजरातकडून सलामीला उतरलेल्या वृद्धिमान साहा याला अर्जुन तेंडुलकर याने 4 धावांवर स्वस्तात बाद करून मुंबईला पहिली विकेट मिळवून दिली. मात्र, दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या शुबमन गिल याने या सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी साकारली. यावेळी अर्जुन तेंडुलकर आणि शुबमन गिल यांना आमने-सामने पाहून चाहत्यांनी सारा तेंडुलकर हीचे मीम्स व्हायरल करत ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला.

शुबमन गिल (Shubman Gill) हा भारतीय क्रिकेटचे भविष्य आहे, तर दुसरीकडे भारतीय संघाचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) हा गिलविरुद्ध गोलंदाजी करताना दिसला. अर्जुन तेंडुलकर आणि शुबमन गिल (Arjun Tendulkar And Shubman Gill) यांचा सामना फक्त एका षटकापुरता राहिला. यावर गिलला फक्त एक धाव घेता आली. त्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने अर्जुनच्या सुरुवातीच्या षटकांचा सामना केला. यानंतर ट्विटरवर जोरदार प्रतिक्रिया आल्या.

एका युजरने ट्वीटमध्ये फोटो शेअर करत लिहिले की, “शुबमन गिल अर्जुन तेंडुलकर शुबमन गिलला गोलंदाजी करताना.”

https://twitter.com/JohnyBravo183/status/1650863308529106951

दुसऱ्या एका युजरने व्हिडिओ शेअर करत ट्वीटमध्ये लिहिले की, “जेव्हा शुबमन अर्जुनच्या चेंडूवर बाऊंड्री मारेल, तेव्हा सारा तेंडुलकर.”

https://twitter.com/weRabbit12/status/1650896791846486016

आणखी एकाने आयुषमान खुराना याच्या एका सिनेमातील फोटो ट्वीट करत लिहिले की, “गुजरात टायटन्सचे फलंदाज अर्जुनविरुद्ध फटके मारतात, तेव्हा अर्जुन शुबमनला म्हणतो.”

https://twitter.com/ankit_acerbic/status/1650859521965981697

एका युजरने ट्वीट करत लिहिले की, “हा सामना अर्जुन विरुद्ध गिल असा आहे.”

https://twitter.com/aftab169/status/1650866933611528194

एकाने ‘3 इडियट्स’ सिनेमातील एक सीन ट्वीट करत लिहिले की, “सचिन आणि सारा शुबमनच्या अर्धशतकावर.”

https://twitter.com/sagarcasm/status/1650875009915842564

अशाचप्रकारे वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

https://twitter.com/smileandraja/status/1648649280222011398

https://twitter.com/ArunTuThikHoGya/status/1650875465299632131

https://twitter.com/meme_ki_diwani/status/1650855827836915714

https://twitter.com/abhinavj617/status/1650873223716941825

अर्जुन तेंडुलकर आणि शुबमन गिलची कामगिरी
अर्जुन तेंडुलकर याने सामन्यात 2 षटके गोलंदाजी करताना 9 धावा खर्च करत 1 विकेट नावावर केली. तसेच, शुबमन गिल याने सामन्यात 34 चेंडूत 56 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर गुजरातने मुंबईपुढे 208 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पार करताना मुंबईला अपयश आले. त्यांना निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 152 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना गुजरातने 55 धावांच्या फरकाने जिंकला. (ipl 2023 twitter reactions batsman shubman gill face off arjun tendulkar in gt vs mi clash)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रहाणेच्या कसोटी कमबॅकवर आली सर्वात मोठी प्रतिक्रिया, माजी निवडकर्ता आनंदी; म्हणाला, ‘याचे श्रेय…’
‘काय करतोय तू, 12 सिक्स मारणार का?’, पीयुष चावलाला क्रीझवरून हटवणाऱ्या वढेरावर संतापले नेटकरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---