Shashank Singh Punjab Kings IPL 2024: आयपीएल 2024चा मिनी लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत पार पडला. यादरम्यान पंजाब किंग्स संघाकडून मोठी चूक झाली होती. पंजाबने लिलावात शशांक सिंग या खेळाडूला चुकून खरेदी केले होते. यानंतर पंजाब किंग्सने चुकीच्या खेळाडूला खरेदी करण्यावर स्पष्टीकरण दिले. पंजाबने सोशल मीडियाद्वारे स्पष्ट केले आणि म्हटले की, तो खेळाडू स्क्वॉडमध्ये येऊन खुश आहे. आता शशांकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संघाला धन्यवाद दिला आहे.
पंजाब किंग्सची पोस्ट
पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) लिहिले की, “किंग्स स्पष्ट करू इच्छिते की, खेळाडू नेहमीच आमच्या खरेदीच्या यादीत होता. गोंधळ झाला, कारण एकसारख्या नावाचे दोन खेळाडू यादीत दिसले. आम्ही शशांक सिंग (Shashank Singh Punjab Kings) याला स्क्वॉडमध्ये सामील करून खुश आहोत आणि आमच्या यशात त्याला योगदान देताना पाहायचे आहे.”
https://twitter.com/PunjabKingsIPL/status/1737449448048042006
शशांकने दिला संघाला धन्यवाद
आता या पोस्टवर 31 वर्षीय शशांक सिंग (Shashank Singh) याने रिप्लाय दिला आहे. त्याने लिहिले आहे की, “हे सर्व चांगले आहे. माझ्यावर विश्वास दाखवण्यासाठी धन्यवाद.”
https://twitter.com/shashank2191/status/1737455309168480438
खरं तर, शशांक सिंग आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्स (आताची दिल्ली कॅपिटल्स), राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांचा भाग राहिला आहे. आता आयपीएल 17 (IPL 17) हंगामात तो पंजाब किंग्सच्या जर्सीत दिसेल.
पंजाब किंग्सचे स्क्वॉड
शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिविंगस्टोन, अर्थव तायडे, अर्शदीप सिंग, नेथन एलिस, सॅम करन, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चाहर आणि हरप्रीत भाटिया
आयपीएल 2024 लिलावात खरेदी केलेले खेळाडू
हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंग, शशांक सिंग, तनय त्यागराजन, प्रिंस चौधरी आणि रायली रूसो (ipl 2024 auction accidental purchase cricketer shashank singh responds to punjab kings welcome message know here)
हेही वाचा-
‘धोनीने ज्याला मागितले, त्याला आम्ही विकत घेतले’, सीएसकेच्या सीईओची लिलावानंतर प्रतिक्रिया
IPL लिलावात 20.50 कोटी घेणाऱ्या कमिन्सला घरचा आहेर; दिग्गज म्हणाला, ‘तो तर कसोटी प्लेअर…’





