IPL 2024 Auction Dubai: जगभरातील सर्व क्रिकेटप्रेमी सध्या एका गोष्टीची खूपच वाट पाहत आहेत. ती म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीग होय. आयपीएल 2024 स्पर्धेचा हंगाम अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यापूर्वी आयपीएल 2024 लिलावाशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर येत आहे. आयपीएल 2024 लिलावाची तारीख आणि ठिकाणाविषयी अधिकृत घोषणा झाली आहे. आयपीएलने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे.
आयपीएल 2024 लिलाव कुठे आणि कधी होणार?
इंडियन प्रीमिअर लीगने (Indian Premier League) त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून आयपीएल 2024 लिलावाची तारीख आणि ठिकाण (IPL 2024 Auction Date And Venue) सांगितले आहे. 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये आयपीएल 2024 लिलाव (IPL 2024 Auction) पार पडणार असल्याचे आयपीएलने त्यांच्या एक्स (पूर्वीचं ट्विटर) अकाऊंटवरून सांगितलं आहे.
𝗜𝗣𝗟 𝟮𝟬𝟮𝟰 𝗔𝘂𝗰𝘁𝗶𝗼𝗻 🔨
🗓️ 19th December
📍 𝗗𝗨𝗕𝗔𝗜 🤩
ARE. YOU. READY ❓ #IPLAuction | #IPL pic.twitter.com/TmmqDNObKR
— IndianPremierLeague (@IPL) December 3, 2023
येत्या 19 डिसेंबर रोजी खेळाडूंवर बोली लागेल आणि ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा आयपीएल लिलाव परदेशात आयोजित होईल. अशात आपण आयपीएल 2024 स्पर्धेशी संबंधित सर्व माहिती जाणून घेऊयात…
IPL 2024 Auction मध्ये किती खेळाडू?
आयपीएल 2024 स्पर्धेच्या आगामी हंगामासाठी 19 डिसेंबर हा लिलाव दिवस म्हणून घोषित केला आहे. या दिवशी एकूण 1166 खेळाडू आयपीएल स्पर्धेत भाग घेण्यासाठी उतरतील. यातील 909 खेळाडू हे अनकॅप्ड (राष्ट्रीय संघाकडून न खेळलेले) आहेत. यातील 812 खेळाडू भारतीय आहेत.
खरं तर, आयपीएल 2024 स्पर्धेत एकूण 10 फ्रँचायझी भाग घेत आहेत. यांच्याकडे तब्बल 77 जागा आहेत, ज्यातील 30 जागा परदेशी खेळाडूंसाठी असू शकतात.
आयपीएल लिलावासाठी कोणत्या संघाकडे किती रक्कम?
लखनऊ सुपर जायंट्स (LSG)- 13.15 कोटी रुपये
राजस्थान रॉयल्स (RR)- 14.5 कोटी रुपये
मुंबई इंडियन्स (MI)- 15.25 कोटी रुपये
गुजरात टायटन्स (GT)- 38.15 कोटी रुपये
दिल्ली कॅपिटल्स (DC)- 28.95 कोटी रुपये
पंजाब किंग्स (PBKS)- 29.1 कोटी रुपये
चेन्नई सुपर किंग्स (CSK)- 31.4 कोटी रुपये
कोलकाता नाईट रायडर्स (KKR)- 32.7 कोटी रुपये
सनरायझर्स हैदराबाद (SRH)- 34 कोटी रुपये
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB)- 23.25 कोटी रुपये (ipl 2024 auction date venue time announced know all about here)
हेही वाचा-
Video: युवराज सिंगने शेअर केला इन्स्टाग्राम विरूद्ध रिऍलिटी व्हिडिओ; सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
ना सचिन ना विराट! पाकिस्तानी गोलंदाजाच्या मते ‘हा’ आहे भारताचा सर्वात महान फलंदाज