आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना पंजाब किंग्ज विरुद्ध आहे. हा सामना 23 मार्च रोजी चंदीगड येथे खेळला जाईल.
या सामन्यापूर्वीच दिल्लीला मोठा धक्का बसला आहे. संघाचा उत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक लुंगी एनगिडी या मोसमातून बाहेर पडला. तो दुखापतीमुळे आयपीएलच्या या हंगामात खेळू शकणार नाही.
एनगिडीच्या जागी आता ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू जेक फ्रेझर मॅकगर्कचा संघात समावेश करण्यात आला आहे. फ्रेझर 29 चेंडूत शतक झळकावून प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्यानं अनेक प्रसंगी आपल्या संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. जेकनं ऑस्ट्रेलियाकडून 2 एकदिवसीय सामने खेळले आहेत. दिल्ली कॅपिटल्सनं त्याला आयपीएल 2024 साठी 50 लाख रुपये देऊन संघात समाविष्ट केलं. ही त्याची लिलावातीव बेस प्राईज होती.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये जेकचा रेकॉर्ड चांगला आहे. त्यानं 16 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 550 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्यानं 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावलं. फ्रेझर मॅकगर्कनं 21 लिस्ट ए सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याच्या बॅटमधून 525 धावा निघाल्या. या फॉरमॅटमध्ये त्यानं एक शतक आणि एक अर्धशतक झळकावलं आहे.
फ्रेझर मॅकगर्क ‘द मार्श कप’मध्ये 29 चेंडूत शतक झळकावून प्रकाशझोतात आला होता. दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून खेळताना त्यानं तस्मानिया विरुद्ध 38 चेंडूंचा सामना करत 125 धावा केल्या. या दरम्यान त्यानं 10 चौकार आणि 13 षटकार मारले. हा सामना ऑक्टोबर 2023 मध्ये झाला होता.
दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज लुंगी एनगिडीबद्दल सांगायचं झालं तर, त्यानं अनेक वेळा संघासाठी शानदार गोलंदाजी केली आहे. एनगिडीनं आयपीएलमध्ये 14 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्यानं 25 विकेट्स घेतल्या. 10 धावांत 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. याशिवाय त्यानं 40 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 60 विकेट घेतल्या आहेत. या दरम्यान त्याची सर्वोत्तम कामगिरी 39 धावांत 5 विकेट्स ही राहिली.
आयपीएल 2024 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. नुकताच इंग्लंडचा स्फोटक फलंदाज हॅरी ब्रूकनं या सीजनमधून वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली. त्याला दिल्लीनं लिलावत 4 करोड रुपयांमध्ये करारबद्ध केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका, 4 कोटी रुपयांना खरेदी केलेला स्टार फलंदाज IPL मधून बाहेर
ऋषभ पंत तब्बल 662 दिवसांनंतर दिसला दिल्ली कॅपिटल्सच्या जर्सीत, IPL 2024 साठी प्रॅक्टिस सुरू