इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामाची क्रिकेट चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. येत्या 22 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होईल. त्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघात विशेषत: कर्णधारपदाबाबत काही मोठे बदल होऊ शकतात, अशा अफवा सुरू होत्या.
काही दिवसांपूर्वी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं फेसबुक पोस्टद्वारे सांगितलं होतं की, तो एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे या आयपीएलमध्येच धोनी कर्णधारपद सोडून मेंटॉर किंवा प्रशिक्षक बनू शकतो, असा अंदाज चाहत्यांनी बांधला होता. मात्र आता आयपीएल सुरू होण्यास केवळ एक आठवडा बाकी आहे. अशा स्थितीत चेन्नई संघात एवढा मोठा बदल होणे शक्य नाही. त्यामुळे आता पुढील हंगामातच धोनी काही निर्णय घेऊ शकतो, असं बोललं जातंय.
पुढील वर्षी कर्णधारपदात बदल झाल्यास काही खेळाडू मोठे दावेदार असू शकतात. कर्णधारपदासाठी मोठ्या दावेदारांमध्ये ऋतुराज गायकवाड आघाडीवर आहे. त्याच्याशिवाय रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे यांनाही अनुभवाच्या बाबतीत दावेदार मानलं जाऊ शकतं. 2022 च्या हंगामात जडेजाकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. परंतु त्याच्या नेतृत्वात संघाची कामगिरी खूपच खराब राहिली. त्यानंतर हंगामाच्या मध्यावर धोनीनं पुन्हा कमान हाती घेतली.
याशिवाय जडेजाचं वयही कर्णधारपदाच्या आड येऊ शकतं. तो आता 35 वर्षांचा झाला आहे. 35 वर्षीय रहाणेसाठी देखील वय हा एक मोठा अडथळा आहे. रहाणेनं चेन्नईसाठी गेल्या मोसमात 14 सामने खेळले, ज्यात त्यानं 32.60 च्या उत्कृष्ट सरासरीनं 326 धावा केल्या. या दरम्यानं त्यानं 2 अर्धशतकं झळकावली होती. अशा स्थितीत फॉर्म आणि खेळ बघितला तर रहाणेही कर्णधारपदाच्या शर्यतीत मोडतो.
यावेळी धोनी संपूर्ण हंगामात कर्णधार असेल अशी अपेक्षा आहे. याचं मोठं कारण म्हणजे पुढील वर्षी म्हणजे 2025 च्या आयपीएल हंगामासाठी मेगा लिलाव होणार आहे. मेगा लिलावात सर्व संघ पुन्हा नव्या स्वरूपात तयार होतील. संघांना जास्तीत जास्त 4 खेळाडू ठेवण्याची परवानगी आहे. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज आपल्या नवीन कर्णधारासह नवा संघ तयार करण्याची योजना आखू शकते. मेगा लिलाव दर 3 वर्षांनी एकदा होतं असतो.
चेन्नई सुपर किंग्ज संघ –
कायम ठेवलेले खेळाडू : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), मोईन अली, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे (आयपीएल मधून बाहेर), तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पाथिराना, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी आणि महेश तिक्षना.
लिलावात विकत घेतलेले खेळाडू : रचिन रवींद्र (1.80 कोटी रुपये), शार्दुल ठाकूर (4 कोटी), डॅरिल मिशेल (14 कोटी), समीर रिझवी (8.4 कोटी), मुस्तफिझूर रहमान (2 कोटी) आणि अवनीश राव अरवेली (20 लाख).
महत्त्वाच्या बातम्या-
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! टी 20 विश्वचषकातील भारत-पाक सामन्यासाठी राखीव दिवस जाहीर
मुंबई इंडियन्सला मिळाला नवा मलिंगा? ईशानचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
पाच असे दिग्गज खेळाडू जे कधीच IPL मध्ये खेळू शकले नाहीत, जाणून घ्या