आयपीएल 2024 च्या 22 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने होते. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सोमवारी (8 एप्रिल) हा सामना खेळला गेला. या सामन्यात चेन्नईनं कोलकातावर 7 गडी राखून विजय मिळवला आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना केकेआरची टीम निर्धारित 20 षटकांत 9 विकेट गमावून केवळ 137 धावाच करू शकली. चेन्नईनं 138 धावांचं लक्ष्य 17.4 षटकांत 3 गडी गमावून गाठलं.
चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडनं 58 चेंडूत 67 धावांची नाबाद खेळी केली. शिवम दुबेनं 28, डॅरेल मिशेलनं 25 आणि रचिन रवींद्रनं 15 धावा केल्या. केकेआरकडून वैभव अरोरानं 2 आणि सुनील नरेननं 1 बळी घेतला. हा सामना जिंकून चेन्नईचा संघ विजयी मार्गावर परतला आहे. चेन्नईनं या मोसमात आतापर्यंत 5 पैकी 3 सामने जिंकले असून 2 गमावले आहेत. दुसरीकडे, श्रेयसच्या नेतृत्वाखाली कोलकाता संघानं या मोसमातील पहिला सामना गमावला आहे. त्यांनी पहिले तीन सामने जिंकले होते.
प्रथम फलंदाजी करताना कोलकाताची सुरुवात खूपच खराब झाली होती. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर तुषार देशपांडेनं फिल सॉल्टची विकेट घेतली. केकेआरची मधली फळीही सपशेल अपयशी ठरली. संघाचा एकही फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही. केकेआरकडून कर्णधार श्रेयस अय्यरनं 34, सुनील नारायणनं 27 आणि अंगक्रिश रघुवंशीनं 24 धावा केल्या. चेन्नईकडून अष्टपैलू रवींद्र जडेजानं 18 आणि वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेनं 33 धावा देत प्रत्येकी 3-3 बळी घेतले. तर मुस्तफिजूर रहमानला 2 आणि तीक्ष्णाला 1 विकेट मिळाली.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, महेश थिक्ष्णा
इम्पॅक्ट प्लेअर्स – शिवम दुबे, मोईन अली, शेख रशीद, मिशेल सॅन्टनर, निशांत सिंधू
कोलकाता नाईट रायडर्स – फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंह, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती
इम्पॅक्ट प्लेअर्स – सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज, साकिब हुसेन
महत्त्वाच्या बातम्या-
रवींद्र जडेजाचा आयपीएलमध्ये अनोखा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू
सततच्या पराभवानंतर आरसीबीचे खेळाडू देवाच्या शरणी, मुंबईच्या सिद्धिविनायकाचं घेतलं दर्शन