आयपीएल 2024 च्या 22 व्या सामन्यात आज (8 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहेत. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळाला जातोय. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलदाजीचा निर्णय घेतला.
चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड : नाणेफेक जिंकणं चांगलं आहे. आम्ही प्रथम गोलंदाजी करू. आमचा आत्मविश्वास कमी झाला नाही, आम्ही थोड्या फरकाने हरलो. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी निश्चितच उत्सुक आहे. ते (कोलकाता) चांगलं क्रिकेट खेळत आहेत. आम्हाला गोष्टी साध्या ठेवायच्या आहेत. पाथिराना उपलब्ध नाही. मुस्तफिजूर परतला आहे. शार्दुल आणि रिझवीही परतले आहेत.
कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर : आम्हीही आधी गोलंदाजी केली असती. आम्ही परिस्थितीचं मूल्यांकन केलं आहे. संघातील प्रत्येकजण पुढे येऊन निर्भय क्रिकेट खेळला आहे. आम्ही फक्त गोष्टी सोप्या ठेवल्या पाहिजेत. ते अधिक चांगलं आहे. आमचं लक्ष वर्तमानावर आहे. आमच्या संघात कोणताही बदल नाही.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, महेश थिक्ष्णा
इम्पॅक्ट प्लेअर्स – शिवम दुबे, मोईन अली, शेख रशीद, मिशेल सॅन्टनर, निशांत सिंधू
कोलकाता नाईट रायडर्स – फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंह, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती
इम्पॅक्ट प्लेअर्स – सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज, साकिब हुसेन
सुरुवातीच्या दोन विजयानंतर सीएसकेला सलग दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. चेन्नईनं आपला शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळला, ज्यात त्यांचा 6 विकेट्सनं पराभव झाला होता. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ गुणतालिकेत सध्या 4 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआर गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये विजयी पताका फडकवली आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये सामनावीर ठरलेल्या सुनील नारायणकडून कोलकाताला पुन्हा एकदा उत्तम कामगिरीची अपेक्षा असेल. तो सलामीला येऊन तुफानी फलंदाजी करतोय तसेच गोलंदाजीत बळीही घेतोय.
दोन्ही संघांच्या हेड-टू-हेड आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर, हे दोन संघ आयपीएलमध्ये आतापर्यंत 29 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यापैकी चेन्नईनं 18 तर कोलकातानं 10 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शुबमन गिलची बॅटिंग पाहण्यासाठी हे छोटे चाहते चक्क 12 हजार किलोमीटरचा प्रवास करून आले!