आयपीएल 2024 ची प्रतीक्षा आता संपली आहे. येत्या 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची टीम सीजनच्या पहिल्या सामन्यात आमनेसामने येतील. क्रिकेट जगतातील दोन सर्वात लोकप्रिय खेळाडू, विराट कोहली आणि एमएस धोनी यांच्यातील या संघर्षाची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. त्याआधी जाणून घेऊया, या सामन्याची तिकिटं कशी मिळवायची?
आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्याच्या तिकिटांची विक्री सोमवार, 18 मार्च रोजी सकाळी 9:30 वाजता सुरू झाली. तुम्ही पेटीएम इनसाइडरच्या वेबसाइट आणि मोबाइल ऍप्लिकेशनला भेट देऊन तिकिटं खरेदी करू शकता. आयपीएल सामन्यात पहिल्यांदाच प्रेक्षक ई-तिकीट दाखवून मैदानात प्रवेश करू शकतील. यावेळी प्रेक्षकांना तिकिटाच्या स्वरूपात स्लिप घेऊन जाण्याची गरज नाही.
यावेळी बरेच लोक इंटरनेटवर ऑनलाईन तिकीट खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र एक व्यक्ती इंटरनेटवरून फक्त 2 तिकिटं खरेदी करू शकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सीट निवडू शकता. तिकिटांची किंमत 1500 ते 7500 रुपयांपर्यंत आहे. आतापर्यंत आयपीएलच्या फक्त 21 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. उर्वरित वेळापत्रक लोकसभा निवडणुकीच्या तारखा लक्षात घेऊन जाहीर केलं जाईल.
चेन्नई विरुद्ध बंगळुरूचा पहिला सामना चेन्नईच्या एम. ए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. म्हणजेच महेंद्रसिह धोनी त्याच्या संघाच्या घरच्या चाहत्यांसमोर स्पर्धेची सुरुवात करेल. हा सामना 22 मार्च रोजी होणार आहे. प्रेक्षक घरात बसून रात्री 8 वाजल्यापासून सामना लाईव्ह पाहू शकतात.
त्याआधी, आयपीएलचा उद्घाटन सोहळा संध्याकाळी 6.30 वाजल्यापासून होणार आहे, ज्यामध्ये अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी सहभागी होऊ शकतात. ज्यांना मैदानावर जाऊन सामना बघायचा आहे, ते पेटीएम इनसाइडरवर जाऊन लगेच तिकीटं खरेदी करू शकतात. आरसीबी आणि सीएसके सामन्याची तिकिटं विविध श्रेणींत मिळत आहेत. 1700 रुपयांपासून तर 7500 रुपयांपर्यंतची तिकिटं उपलब्ध आहेत. सोमवारी या साईटवर हजारोंच्या संख्येनं चाहते पोहचल्यानं वेबसाइट क्रॅश झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
CSK vs RCB सामन्याच्या तिकिटांसाठी चाहत्यांची चढाओढ, बुकिंग सुरू होताच वेबसाइट क्रॅश
IPL सोडा, PSL ची बक्षीस रक्कम तर WPL पेक्षाही कमी! जाणून घ्या चॅम्पियन इस्लामाबादला किती पैसै मिळाले
पाकिस्तानी खेळाडूचा प्रताप! लाइव्ह मॅचदरम्यान सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल