आयपीएल 2024च्या 43व्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्स समोर मुंबई इंडियन्सचं आव्हान आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या – आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. लहान मैदानावर नंतर फलंदाजी करणं चांगलं. प्रत्येक मॅच वेगळी असते. संघामध्ये मूड ठीक आहे. सर्व ठीक आहे. भूतकाळात काय घडलं यावर आपण लक्ष केंद्रित करू नये. कोणीही कोणालाही हरवू शकतं. आमच्या संघात फक्त एक बदल. कोएत्झीच्या जागी ल्यूक वुड आला आहे.
दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत – आम्ही प्रथम फलंदाजीच करणार होतो. मला वाटतं की दुसऱ्या डावात खेळपट्टीचा वेग कमी होईल. एक संघ म्हणून आम्हाला चांगलं खेळायचं आहे. नवीन चेंडूनं आणि अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजी करणं कठीण आहे. येथे एक ओव्हर इकडे-तिकडे झाला तर खूप फरक पडतो. आमच्या संघात एक बदल, पृथ्वी शॉच्या जागी कुमार कुशाग्र आला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नेहाल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, पीयूष चावला, ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा
इम्पॅक्ट प्लेअर्स – सूर्यकुमार यादव, नमन धीर, शम्स मुलानी, डेवाल्ड ब्रेविस, कुमार कार्तिकेय
दिल्ली कॅपिटल्स – जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुमार कुशाग्रा, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिझाद विल्यम्स, मुकेश कुमार, खलील अहमद
इम्पॅक्ट प्लेअर्स – रसिक दार सलाम, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, रिकी भुई, सुमित कुमार
रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघ सुरुवातीच्या पराभवांनंतर आता विजयाच्या मार्गावर परतला आहे. संघानं शेवटच्या चारपैकी तीन सामने जिंकले असून ते प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत. आयपीएलच्या या हंगामात दिल्ली कॅपिटल्सनं आतापर्यंत 9 सामने खेळले, ज्यापैकी त्यांनी 4 सामने जिंकले असून 5 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. दिल्लीचा संघ 8 अंकांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.
दुसरीकडे, मुंबई इंडियन्सला विजयाची मालिका कायम राखता आलेली नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सनं गेल्या पाचपैकी तीन सामने जिंकले आहेत. संघाला मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यांपैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला असून संघ 6 अंकांसह गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या मध्यात जसप्रीत बुमराहनं केली नव्या इनिंगची घोषणा, चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह!
पंजाबविरुद्ध कोलकातानं केलं मिचेल स्टार्कला प्लेइंग 11 मधून बाहेर, जाणून घ्या कारण