---Advertisement---

आयपीएलमध्ये आज मुंबई – दिल्ली आमनेसामने, विजयाच्या वाटेवर परतण्यासाठी मुंबई सज्ज, हार्दिकच्या कामगिरीवर सर्वांची नजर

IPL 2024 DC vs MI
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2024 मध्ये आज (दि. 27 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ आमनेसामने असणार आहे. मागील चारपैकी तीन सामने जिंकलेल्या दिल्लीचे कडवे आव्हान आज (दि. 27) मुंबई पुढे असणार आहे. दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर दिल्ली आणि मुंबईत आयपीएलचा 43वा सामना दुपारी 3.30 वाजता सुरु होईल.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाला आतापर्यंत आठपैकी केवळ तीन सामने जिंकता आले आहेत. महत्वाचे म्हणजे या सर्व सामन्यांत हार्दिकची कामगिरी सुमार राहिली आहे. मागील तीन सामन्यांत पराभव, विजय, पराभव अशी सध्या मुंबईची कामगिरी आहे. त्यासह मुंबईचे आता फक्त सहा सामने शिल्लक आहेत, त्यामुळे ‘प्ले-ऑफ’चे तिकीट मिळवण्यासाठी मुंबईला प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे हार्दिकच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे. ( IPL 2024 DC vs MI Live Prediction Delhi Capitals vs Mumbai Indians Predicted Playing XI Squads )

दुसरीकडे कर्णधार रिषभ पंतला चांगलाच सुर गवसल्याने दिल्लीचे पारडे जड आहे. सुरुवातीच्या पाचपैकी चार सामन्यांत पराभव पत्करणाऱ्या दिल्लीने गेल्या चारपैकी तीन सामन्यांत विजय नोंदवले आहेत. त्यामुळे आजचा सामना अटीतटीचा होणार हे निश्चित आहेत. यासह रोहित, सुर्यकुमार यादव यांच्यावरही सर्वांची नजर असेल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---