---Advertisement---

आयपीएलच्या मध्यात जसप्रीत बुमराहनं केली नव्या इनिंगची घोषणा, चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह!

---Advertisement---

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या तुफान फॉर्मात आहे. आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो सध्या अव्वल स्थानी आहे. बुमराहनं आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यांमध्ये 13 विकेट घेतल्या आहेत.

दरम्यान, बुमराहनं आयपीएलच्या मध्यावर एक मोठी घोषणा केली. तो आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. जसप्रीत बुमराहनं त्याचं स्वत:चं यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. त्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली. बुमराह म्हणाला की तो त्याच्या चॅनलवर असा कंटेंट देईल जो तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल.

बुमराहने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट शेअर केली. बुमराहनं लिहिलं की, “नमस्कार, मला कळवायचं आहे की मी माझं अधिकृत YouTube चॅनल सुरू केले आहे. येथे तुम्हाला असा कंटेंट मिळेल जो तुम्ही याआधी पाहिला नसेल.” बुमराहच्या या पोस्टला अल्पावधीतच हजारो लोकांनी लाइक केलं आहे. तसेच यावर अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रियाही आल्या आहेत.

 

आयपीएल 2024 मध्ये जसप्रीत बुमराहनं आतापर्यंत 8 सामने खेळले असून त्यानं 13 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या डोक्यावर सध्या ‘पर्पल कॅप’ विराजमान आहे. बुमराहनं पंजाब किंग्जविरुद्ध 21 धावांत 3 बळी घेतले होते. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध त्यानं 21 धावांत 5 बळी घेतले होते. बुमराहनं दिल्लीविरुद्धही 2 विकेट घेतल्या होत्या.

जसप्रीत बुमराह जरी या हंगामात शानदार कामगिरी करत असला तरी त्याची टीम मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईनं आतापर्यंत 8 सामने खेळले असून यापैकी संघाला केवळ 3 सामने जिंकता आले आहेत. मुंबईला 5 सामन्यांमध्ये पराभवाचा पत्कारावा लागलाय. मुंबईनं पंजाब, बंगळुरू आणि दिल्लीविरुद्ध विजय नोंदवला होता. गेल्या सामन्यात त्यांना राजस्थान रॉयल्सनं 9 गडी राखून पराभूत केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या –

पंजाबविरुद्ध कोलकातानं केलं मिचेल स्टार्कला प्लेइंग 11 मधून बाहेर, जाणून घ्या कारण

रिकी पॉन्टिंगनं वर्ल्ड कपमध्ये ‘स्प्रिंग बॅट’ वापरली होती का? 20 वर्षांनंतर झालेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये मोठा खुलासा

क्रुणाल पांड्याच्या घरी पुन्हा पाळणा हालला! पत्नी पंखुडीनं दिला दुसऱ्या मुलाला जन्म

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---