इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील 42 वा सामना काल (दि. 26) पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. धावांचा पाऊस पडलेला हा सामना ऐतिहासिक ठरला आहे. टी20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग करत पंजाब किंग्ज संघाने नवा विक्रम प्रस्तापित केला आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाचे होम ग्राउंड असलेल्या ईडन गार्डन्स मैदानावर शुक्रवारी चौकार-षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. सुरुवातीला कोलकाताने 261 धावांचा डोंगर उभारला होता. कोलकाताचे हे अशक्यप्राय लक्ष्य पंजाबच्या फलंदाजांनी वादळी खेळी करत पार केले. ( KKR vs PBKS highlights IPL 2024 Punjab Kings wins by eight wickets highest total in T20 )
पंजाबने 8 चेंडू आणि 8 विकेट्स राखून कोलकातावर संस्मरणीय विजय मिळवला. यासह कोणत्याही ट्वेन्टी – 20 स्पर्धेत धावांचा पाठलाग करतानाची ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. या सामन्यात विक्रमी 42 षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. दोन्ही संघांनी मिळून 523 धावा चोपल्या. तर जॉनी बेअरस्टोने धावांचा पाठलाग करताना विक्रमी शतक झळकावले.
.@PunjabKingsIPL are roaring again 🦁
A special victory at the Eden Gardens for #PBKS who secure the highest successful run chase in the IPL and T20s ❤️
Scorecard ▶️ https://t.co/T9DxmbgIWu#TATAIPL | #KKRvPBKS pic.twitter.com/FNxVD8ZeW6
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2024
For his phenomenal show with the bat in a record chase, Jonny Bairstow bags the Player of the Match Award 🏆
Scorecard ▶️ https://t.co/T9DxmbgIWu#TATAIPL | #KKRvPBKS pic.twitter.com/G3HVTUmOJF
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2024