पंजाब किंग्जनं शुक्रवारी (26 एप्रिल) झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर ऐतिहासिक विजय मिळवला. पंजाबनं टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला आहे.
पंजाब किंग्जनं कोलकाता नाईट रायडर्सनं दिलेलं 262 धावांचं लक्ष्य 18.4 षटकांतच 2 विकेट गमावून गाठलं. या ऐतिहासिक विजयानंतर आता पंजाबच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाच्या एका स्टार ऑलराउंडरनं टीमची साथ सोडली, जे त्यांना आगामी सामन्यांसाठी नुकसानदायी ठरू शकतं.
आम्ही बोलतोय पंजाब किंग्जचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा याच्याबाबत. सिकंदर रझानं स्वत: आयपीएल सोडण्याची माहिती दिली आहे. त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून सांगितलं की तो राष्ट्रीय संघाचं कर्तव्य निभावण्यासाठी आयपीएल मध्यात सोडतोय. ‘X’ या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये या अष्टपैलू खेळाडूनं लिहिलं की, “धन्यवाद इंडिया! आयपीएल आणि पंजाब किंग्ज यांनी मला संघात घेतलं. मला प्रत्येक क्षणी प्रेम दिलं. आता नॅशनल ड्यूटीची वेळ आली आहे. आपण लवकरच पुन्हा भेटू” या पोस्टसह सिंकदर रझानं आपला एक फोटोही शेअर केला आहे.
झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाला पंजाब किंग्जनं आयपीएल 2024 च्या मिनी लिलावात 50 लाख रुपयांना करारबद्ध केलं होतं. त्यानं या हंगामात संघासाठी केवळ दोन सामने खेळले, ज्यामध्ये त्यानं एकूण 43 धावा ठोकल्या. त्यानं पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध तर दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळला होता.
झिम्बाब्वेची टीम 5 सामन्यांची टी20 मालिका खेळण्यासाठी बांग्लादेशचा दौरा करणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 3 मे पासून होईल. दुसरा सामना 5 मे आणि तिसरा सामना 7 मे रोजी खेळला जाईल. सुरुवातीचे तिनही सामने चिटगांव येथे होणार आहेत. त्यानंतर मालिकेचा चौथा सामना 10 मे रोजी आणि पाचवा सामना 12 मे रोजी ढाका येथे खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या मध्यात जसप्रीत बुमराहनं केली नव्या इनिंगची घोषणा, चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह!