---Advertisement---

दिल्लीविरुद्ध संजू सॅमसननं जिंकला टॉस, प्रथम गोलंदाजी करणार; जाणून घ्या प्लेइंग 11

On: मंगळवार, मे 7, 2024 7:11 PM
---Advertisement---

आयपीएल 2024 च्या 56व्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्ससमोर राजस्थान रॉयल्सचं आव्हान आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन – आम्ही प्रथम गोलंदाजी करू इच्छितो. धावांचा पाठलाग करण्यासाठी विकेट चांगली दिसते. संघातील वातावरण चांगलं आहे. आजच्या सामन्यासाठी ध्रुव जुरेल आणि हेटमायर अनुपलब्ध आहेत. त्याच्याजागी दुबे आणि डोनोव्हन येतात.

दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत – या हंगामातील खेळपट्ट्या फलंदाजीला अधिक अनुकूल आहेत. संघात काही दुखापती, आरोग्याच्या समस्या आहेत परंतु आम्ही त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करत नाही. आम्हाला संघावर लक्ष केंद्रित करावं लागेल आणि आमचे सर्वोत्तम प्रयत्न करावे लागतील. इशांत आणि गुलबदिन संघात आले आहेत.

दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टिरक्षक), रियान पराग, डोनोवन फरेरा, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल

इम्पॅक्ट प्लेअर्स – जोस बटलर, कुलदीप सेन, टॉम कोहलर-कॅडमोर, तनुष कोटियन, कुणाल सिंग राठौर

दिल्ली कॅपिटल्स – जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, रिषभ पंत (कर्णधार/यष्टिरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, गुलबदिन नायब, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद

इम्पॅक्ट प्लेअर्स – रसिक दार सलाम, प्रवीण दुबे, ललित यादव, सुमित कुमार, कुमार कुशाग्रा

चालू हंगामात दिल्ली आणि राजस्थान दुसऱ्यांदा भिडणार आहेत. याआधीच्या सामन्यात राजस्थाननं दिल्लीचा 12 धावांनी पराभव केला होता. दिल्ली आता त्यांच्या घरच्या मैदानावर या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाला त्यांच्या शेवटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून 7 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता. दिल्लीनं आतापर्यंत 10 पैकी 5 सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत हा संघ सहाव्या क्रमांकावर असून त्यांच्या खात्यात 10 गुण आहेत.

दुसरीकडे, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी 10 पैकी 8 सामन्यांत विजयी पताका फडकावला असून संघाचे 16 गुण आहेत. सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात राजस्थानला अवघ्या एका धावेनं पराभव स्वीकारावा लागला होता. सॅमसन सेनेनं आज दिल्लीविरुद्ध विजय मिळवला तर त्यांचं प्लेऑफचे तिकीट पक्क होईल.

दोन्ही संघांच्या हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, राजस्थान आणि दिल्ली आयपीएलमध्ये एकूण 28 वेळा आणनेसामने आले आहेत. यापैकी दिल्लीनं 13, तर राजस्थाननं 15 सामने जिंकले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

केकेआरच्या खेळाडूंना आलं महादेवाचं बोलावणं, विमान कोलकात्याला जाण्याऐवजी वाराणसीला पोहचलं!

निवृत्तीनंतर भारतात स्थायिक होणार का? डेव्हिड वॉर्नर म्हणाला, “मी इथे घर…”

इंग्लंडचे खेळाडू आयपीएलच्या प्लेऑफमध्ये खेळतील की नाही? जाणून घ्या BCCI आणि ECB मध्ये काय चर्चा झाली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---