भारताचा माजी क्रिकेटर आणि केकेआरच्या माजी कर्णधार गौतम गंभीर पुन्हा एकदा केकेआरमध्ये परतला आहे. तो याआधी लखनौ संघासोबत जोडलेला होता. पण त्याने आता आपल्या पदाचा राजीनामा दिला असून तो पुन्हा एकदा केकेआर सोबत जोडला गेला आहे. तर, गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला IPL 2012 आणि IPL 2014 चे विजेतेपद मिळवून दिले होते.
याबरोबरच, गौतम गंभीर IPL 2022 आणि IPL 2023 मध्ये लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघात मार्गदर्शकाच्या भूमिकेत पहायला मिळाला होता. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाने 2012 आणि 2014 मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली हे विजेतेपद पटकावले होते. 2012 मध्ये चॅम्पियन बनलेल्या संघात न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि सध्याचा इंग्लंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम देखील होता.
अशातच गंभीरने मॅक्युलमबाबत एक मोठा खुलासा केला आहे. तर त्याने म्हटले आहे की, आयपीएल 2012 दरम्यान त्याने संपूर्ण संघासमोर कोलकात्याच्या माजी सलामीवीराची माफी मागितली होती. तसेच, अंतिम सामन्यापूर्वी वेगवान गोलंदाज लक्ष्मीपती बालाजीला झालेल्या दुखापतीमुळे गंभीर अडचणीत आला होता. परिणामी त्याने फॉर्मात असलेल्या मॅक्युलमला वगळण्याचा निर्णय घेतला होता.
त्याच्यासोबत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीचा देखील समावेश होता. इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, भारताचा माजी सलामीवीर गंभीरने खुलासा केला आहे की, निर्णय घेतल्यानंतर संपूर्ण केकेआर संघासमोर त्याने मॅक्युलमला सॉरी म्हंटले होते.
घ्या जाणून गंभीर मॅक्युलमला काय म्हणाला होता?
गौतम गंभीरने म्हंटले आहे की, “चेपॉकमध्ये अंतिम फेरीसाठी रवाना होण्यापूर्वी मी खरोखरच संपूर्ण संघासमोर ब्रेंडन मॅक्युलमची माफी मागितली होती. तसेच पुढे बोलताना गंभीर म्हणाला आहे की, मी त्याला सांगितले की मला तुला बाहेर काढावे लागले याबद्दल मला खरोखर माफ कर याचं कारण तुमची कामगिरी नाही, याचं कारण आमचं कॉम्बिनेशन आहे. कुणालाही तसे करायचे नव्हते. पण संपूर्ण टीमसमोर त्याची माफी मागण्याची हिंमत माझ्यात होती.”
दरम्यान, गौतम गंभीरने 2011 ते 2017 पर्यंत कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) नेतृत्व केले. 2017 नंतर, गौतम गंभीर आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) वेगळे झाले. परंतु आता गौतम गंभीर 6 वर्षांनंतर पुन्हा एकदा कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघात परतला आहे.
महत्वाच्या बातम्या –
जडेजाच्या वडिलांनी तोडले मुलाशी सर्व संबंध, घरातील वाद चव्हाट्यावर; पत्नी रिवाबा ठरली कारण
रणजी करंडक सामन्यात मुंबईकर पृथ्वी शॉ ला अखेर सूर गवसला, ठोकलं दमदार शतक