अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या गुजरात टायटन्सने आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात गुजरातचा विजय झाला आहे. गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 35 धावांनी पराभव केला आहे. ( IPL 2024 GT vs CSK Highlights Gujarat Titans beat Chennai Super Kings by 35 runs in Ahmedabad )
गुजरातने या विजयासह प्लेऑफच्या शर्यतीतील आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. शुभमन गील आणि साई सुदर्शन यांची वादळी शतके गुजरातच्या विजयाचा पाया ठरली. तसेच चेन्नईच्या कालच्या (दि. 10 मे) पराभवामुळे प्लेऑफची शर्यत आता अधिक रोमांचक बनली आहे.
महत्वाचे म्हणजे गुजरातच्या विजयामुळे आरसीबीसाठीही प्लेऑफ गाठणे सोपे झाले आहे. कालच्या सामन्यात आधी फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने 20 षटकांत 3 बाद 231 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नईचा संघ केवळ 8 बाद 196 धावा करू शकला.
गुजरातकडून शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी शतके झळकावली, तर गोलंदाजीत मोहित शर्मा आणि राशिद खान यांनी कमाल दाखवली. चेन्नईकडून गोलंदाजीत तुषार देशपांडे वगळता कोणालाही यश मिळाले नाही. तर, फलंदाजीत सलामीवर अयशस्वी ठरले. मोईन अली, मिशेल यांची अर्धशतके संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.
For his excellent 💯 and leading from the front, Shubman Gill wins the Player of the Match Award 🏆
Scorecard ▶️ https://t.co/PBZfdYswwj#TATAIPL | #GTvCSK pic.twitter.com/DI3iPp8awE
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2024