आयपीएल 2024 च्या 12 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने होते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात गुजरातनं हैदराबादचा 7 गडी राखून पराभव केला आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादनं निर्धारित 20 षटकात 8 बाद 162 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, गुजरातनं 163 धावांचं लक्ष्य 19.1 षटकांत 3 गडी गमावून गाठलं. गुजरात टायटन्ससाठी इम्पॅक्ट प्लेअर साई सुदर्शननं 36 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकारासह सर्वाधिक 45 धावा केल्या. तर डेव्हिड मिलरनं 27 चेंडूत 44 धावांची नाबाद खेळी केली. मिलरनं आपल्या खेळीत चार चौकार आणि दोन षटकार मारले.
मिलर आणि सुदर्शन यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे सनरायझर्स सामन्यातून पूर्णपणे बाहेर झाली. गुजरातचा हा तीन सामन्यांतील दुसरा विजय आहे. तर सनरायझर्स हैदराबादचा हा तीन सामन्यांतील दुसरा पराभव आहे.
गुजरातकडून डेव्हिड मिलरनं 44 धावांची शानदार खेळी केली. 27 चेंडूंचा सामना करताना त्यानं 4 चौकार आणि 2 षटकार मारले. मिलर नाबाद राहिला. साई सुदर्शननं 45 धावांची खेळी केली. 36 चेंडूंचा सामना करताना त्यानं 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. विजय शंकर 14 धावा करून नाबाद राहिला.
प्रथम फलंदाजी करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली, पण मयंक अग्रवाल पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला केवळ 16 धावा करता आल्या. ट्रॅव्हिस हेड 19 धावा करून बोल्ड झाला. पॉवरप्लेमध्ये हैदराबादनं 1 गडी गमावून 55 धावा केल्या होत्या. वॉशिंग्टन सुंदरचं खातं उघडलं नाही. तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तर कर्णधार पॅट कमिन्स 2 धावा करून नाबाद राहिला.
हैदराबादकडून अभिषेक शर्मानं 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 29 धावा केल्या. अब्दुल समदनंही 29 धावांचं योगदान दिलं. हेन्रिक क्लासेननं 24 धावा केल्या. तर एडन मार्करम 17 धावा करून बाद झाला. गुजरात टायटन्सकडून मोहित शर्मानं शानदार गोलंदाजी केली. त्यानं 4 षटकात 25 धावा देत 3 बळी घेतले. तर उमेश यादव, नूर अहमद, उमरझाई आणि राशिद खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, राशिद खान, उमेश यादव, नूर अहमद, मोहित शर्मा, दर्शन नळकांडे
इम्पॅक्ट प्लेअर्स – साई सुदर्शन, रविश्रीनिवासन साई किशोर, शरथ बीआर, मानव सुथार, अभिनव मनोहर
सनरायझर्स हैदराबाद – मयंक अग्रवाल, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट
इम्पॅक्ट प्लेअर्स – उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, उपेंद्र यादव
महत्त्वाच्या बातम्या-
मयंक यादवच्या वेगवान चेंडूवर प्रीती झिंटाही फिदा! ‘डिंपल गर्ल’ची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल
सनरायझर्स हैदराबाद अडचणीत! मुख्य फिरकी गोलंदाज दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर
5 अनकॅप्ड भारतीय गोलंदाज, जे 150 च्या वेगानं गोलंदाजी करू शकतात