आयपीएल 2024 च्या 28व्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचे संघ आमनेसामने आहेत. कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
लखनऊ सुपर जायंट्स आज कोलकाताचा प्रसिद्ध फुटबॉल क्लब ‘मोहन बागान’ च्या जर्सीचा रंग (मरून आणि हिरवा) परिधान करत आहेत. लखनऊचे मालक या ऐतिहासिक फुटबॉल क्लबचे देखील मालक आहेत.
कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर – आम्ही प्रथम गोलंदाजी करू. गर्दी उत्साहवर्धक आहे. आम्ही कोलकातामध्ये खेळणं मिस करत होतो. येथे परत आल्याचा आनंद वाटतोय. रिंकू सिंहच्या जागी हर्षित राणा संघात येतोय.
लखनऊचा कर्णधार केएल राहुल – आम्हीही आधी गोलंदाजी केली असती. पण ही खेळपट्टी चांगली दिसते. आमच्या संघात काही बदल आहेत. देवदत्त पडिक्कल आणि नवीन-उल-हक आजच्या सामन्यात मुकले आहेत. त्यांच्या जागी शमर जोसेफ आणि दीपक हुडा आले आहेत. मोहसीन खानही परत आला आहे
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
कोलकाता नाईट रायडर्स – फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), दीपक हुडा, आयुष बदोनी, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, क्रुणाल पांड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, शामर जोसेफ, यश ठाकूर
दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सनं आयपीएलच्या या हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. संघानं पहिले तीन सामने जिंकले मात्र चौथ्या सामन्यात त्यांना चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स 6 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्सनं पाच सामने खेळले आहेत. ज्यापैकी त्यांनी तीन जिंकले, तर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. गुणतालिकेत लखनऊचा संघ 6 अंकांसह चौथ्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पंजाब किंग्ज अडचणीत, कर्णधार शिखर धवन दुखापतग्रस्त; जाणून घ्या किती सामने खेळणार नाही
मोठी बातमी! रिषभ पंतवर बंदी घातली जाणार? दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार मोठ्या अडचणीत… Rishabh Pant
काय सांगता, रोहित शर्मा बनला चक्क बस ड्रायव्हर! सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल