आयपीएल 2024 चा 29वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या – आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची आहे. सामन्यादरम्यान दव येईल. बऱ्याच धावांची अपेक्षा आहे. आम्ही दोन गेम जिंकू शकलो. आता प्रत्येकाला योगदान द्यावं लागेल. 10 षटकांनंतर दव येऊ शकते. आमच्या संघात कोणताही बदल नाही.
चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड – आम्हीही प्रथम गोलंदाजी केली असती. यावर (टॉस) आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. आम्हाला तिन्ही विभागात चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. नेहमी चढ-उतार हे आयपीएलचं सौंदर्य आहे. आज चांगलं खेळणारा संघ जिंकेल. आमच्या संघात एक बदल, थिक्ष्णाच्या जागी पाथीराणा येतोय.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, ईशान किशन(विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल
इम्पॅक्ट प्लेअर्स – सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, नमन धीर, नेहाल वढेरा, हार्विक देसाई
चेन्नई सुपर किंग्ज – रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान
इम्पॅक्ट प्लेअर्स – मथिशा पाथीराना, निशांत सिंधू, मिचेल सँटनर, मोईन अली, शेख रशीद
आजच्या सामन्यात दोन्ही संघ त्यांचा मागील सामना जिंकून येत आहेत. मुंबई इंडियन्सची या स्पर्धेची सुरुवात खराब झाली होती. मात्र गेल्या दोन सामन्यांत त्यांनी पुन्हा वेग पकडलाय. विशेषत: गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी आरसीबीविरुद्ध ज्या पद्धतीनं फलंदाजी केली, ती पाहण्यासारखी होती. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जनं सलग दोन पराभवानंतर आपला शेवटचा सामना जिंकला असला तरी त्याची गोलंदाजी थोडीशी कमकुवत दिसत आहे. सीएसकेचे फलंदाजही आतापर्यंत आपला खरा खेळ दाखवू शकलेले नाहीत.
गुणतालिकेबद्दल बोलायचं झाल्यास, मुंबई इंडियन्सनं आयपीएल 2024 मध्ये पाच सामने खेळले असून, ते दोन सामने जिंकून चार गुणांसह 7व्या स्थानावर आहेत. तर चेन्नई सुपर किंग्ज 5 पैकी 3 सामने जिंकून तिसऱ्या स्थानावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
लखनऊचे करोडो रुपये पाण्यात! दीपक हुडा पुन्हा एकदा ठरला फ्लॉप
पंजाब किंग्ज अडचणीत, कर्णधार शिखर धवन दुखापतग्रस्त; जाणून घ्या किती सामने खेळणार नाही
अंगावर काटे आणणाऱ्या सामन्यात राजस्थानचा पंजाबवर 3 गडी राखून विजय