आयपीएल 2024 च्या 27 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने होते. मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जनं 20 षटकांत 8 गडी गमावून 147 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, राजस्थान रॉयल्सनं 19.5 षटकांत 7 गडी गमावून हे लक्ष्य गाठलं.
पंजाबकडून सलामीवीर अथर्व तायडे 12 चेंडूत 15 धावा करून बाद झाला. प्रभासिमरन 14 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. सलामीवीर जॉनी बेअरस्टोला 19 चेंडूत केवळ 15 धावा करता आल्या. सॅम करन 6 आणि शशांक सिंह 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. जितेश 24 चेंडूत 29 धावा करून बाद झाला.
पंजाबसाठी इम्पॅक्ट प्लेअर आशुतोष शर्मानं 16 चेंडूत 31 धावांची शानदार खेळी केली. आशुतोष शर्मानं तीन षटकार आणि एक चौकार लगावला. राजस्थानकडून आवेश खान आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. तर कुलदीप सेन, युझवेंद्र चहल आणि ट्रेंट बोल्ट यांना प्रत्येकी एक यश मिळालं.
धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सनं चांगली सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल आणि तनुष कोटियन यांच्यात पहिल्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी झाली. तनुष 31 चेंडूत 24 धावा करून बाद झाला. लियाम लिव्हिंगस्टननं त्याला क्लीन बोल्ड केलं. यशस्वी जयस्वालनं 28 चेंडूत 39 धावा केल्या. कर्णधार सॅमसन 18 आणि रियान परागनं 23 धावांचं योगदान दिलं.
या सामन्यासाठी दोन्ही संघात मोठे बदल करण्यात आले होते. पंजाब किंग्जचा नियमित कर्णधार शिखर धवन किरकोळ दुखापतीमुळे या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. धवनच्या अनुपस्थितीत सॅम करननं संघाची धुरा सांभाळली. दुसरीकडे, राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन 100 टक्के तंदुरुस्त नव्हते. या दोघांनाही विश्रांती देण्यात आली.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 –
राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, केशव महाराज, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल
पंजाब किंग्ज – जॉनी बेअरस्टो, अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, सॅम करन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता, रोहित शर्मा बनला चक्क बस ड्रायव्हर! सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल
मुंबई इंडियन्सनं शेअर केला हार्दिक आणि अगस्त्यचा क्यूट व्हिडिओ, तुम्हीही एकदा पाहाच
6 चेंडूत 6 षटकार! नेपाळच्या क्रिकेटपटूनं केला कहर, युवराज सिंगच्या विक्रमाची बरोबरी