आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत फक्त कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघच प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. उर्वरित दोन स्थानांबाबत अद्यापही चुरशीची लढत सुरु आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी, आरसीबीला त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावं लागेल. मात्र सामन्यापूर्वी हवामानाच्या अंदाजामुळे संघाची चिंता वाढली आहे.
चेन्नई आणि बंगळुरू यांच्यातील सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. परंतु येथील हवामानामुळे आरसीबीच्या फॅन्सची धाकधूक वाढली आहे. शनिवारी, 18 मे रोजी हे दोन्ही संघ आमनेसामने येतील. मात्र 18 मे रोजी बंगळुरूमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
18 मे ला आरसीबी विरुद्ध सीएसके सामन्याच्या दिवशी बंगळुरूमध्ये पावसाची 70 टक्के शक्यता आहे. ‘कर्नाटक वेदर’नुसार, 17 ते 21 मे दरम्यान बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. अशा स्थितीत सीएसके आणि आरसीबी यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यात पावसाचा धोका निर्माण झाला आहे.
दोन दिवसांपूर्वी पावसानं गुजरात टायटन्सचा खेळ खराब केला होता. गुजरातला केकेआरविरुद्धचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा होता. परंतु अहमदाबाच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुसळधार पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. ज्यामुळे गुजरातचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला.
आरसीबी सध्या गुणतालिकेत 14 अंकासह सहाव्या स्थानावर आहे. त्यांचा नेट रनरेट +0.387 एवढा आहे. बंगळुरूनं आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. अशा स्थितीत संघाला शेवटचा सामना जिंकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर हा सामना पावसामुळे वाहून गेला, तर आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. कारण सामना रद्द झाल्यानंतर दोन्ही संघाला एक-एक गुण वाटून दिला जाईल. अशाप्रकारे सीएसकेचे 14 सामन्यांत 15 गुण होतील. तर आरसीबीचा संघ 13 गुणांवरच मर्यादित राहील. त्यामुळे या सामन्यात पावसानं खोळंबा घालू नये, अशी प्रार्थना आरसीबी समर्थक करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“जर मी आरसीबीविरुद्ध खेळलो असतो तर…”, रिषभ पंतनं लगावला बीसीसीआयला टोला; म्हणाला…
आयर्लंडविरुद्ध सलग 3 षटकार मारून बाबर आझमनं केली टीकाकारांची बोलती बंद!