Wasim Jaffer On Rohit Sharma: मुंबई इंडियन्स संघाने शुक्रवारी (दि. 15 डिसेंबर) घेतलेल्या कर्णधार बदलाच्या निर्णयाची चर्चांना उधाण आले आहे. मुंबईने 5 वेळा किताब जिंकून देणाऱ्या रोहित शर्मा याला हटवून हार्दिक पंड्या याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. या निर्णयानंतर क्रिकेटविश्वातून आजी-माजी दिग्गजांनी वेगवेगळी मतं मांडली. यामध्ये देशांतर्गत क्रिकेटमधील मुंबईचा माजी कर्णधार आणि भारतीय संघाचा माजी सलामीवीर वसीम जाफर याचाही समावेश आहे. जाफरने मुंबईच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. आता त्याचे विधान सर्वत्र चर्चेत आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) याचे आयपीएल (IPL) स्पर्धेतील कर्णधार पर्व शुक्रवारी संपुष्टात आले. रोहितने आयपीएल 2013 (IPL 2013) हंगामात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या नेतृत्वाची धुरा हाती घेतली होती. कर्णधारपद स्वीकारताच रोहितने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 या पाच हंगामात संघाला किताब जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. मात्र, मुंबईने मागील महिन्यात हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाकडून ट्रेड केले. त्यानंतर आता त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. याविषयी वसीम जाफर (Wasim Jaffer) व्यक्त झाला.
काय म्हणाला वसीम जाफर?
वसीम जाफर म्हणाला की, “मला आश्चर्य वाटते की, मुंबई इंडियन्स इतक्या लवकर रोहित शर्माच्या पुढे गेली आहे. हे खूपच वेगाने घडले. यामुळे मी थोडा हैराण आहे. जेव्हा त्यांनी ट्रेड केले, तेव्हा कदाचित हार्दिकला हे सांगितले गेले होते की, तो कर्णधाराच्या रूपात येणार आहे. मात्र, रोहितला याविषयी सांगण्यात आले होते की नाही, याविषयी मला माहिती नाही.”
हार्दिकने आपल्या पहिल्या हंगामात गुजरातला 2022मध्ये आयपीएल किताब जिंकून दिला होता. तसेच, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कारही पटकावला होता. आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातने दुसऱ्यांदा आयपीएल अंतिम सामन्यात जागा मिळवली. यावेळी त्यांना अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून पराभूत होऊन उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
पुढे बोलताना जाफर असेही म्हणाला की, “काही लोक असे होते, जे मुंबईचा कर्णधार बनण्यासाठी आशावादी होती. यातील एक म्हणजे सूर्यकुमार यादव, जो भारतीय टी20 संघाचे नेतृत्व करत आहे. तो एका संधीच्या शोधात होता. कारण, त्याने (अलीकडे भारतीय संघाचे) खूप चांगले नेतृत्व केले आहे.”
पंजाब किंग्सच्या फलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका साकारणारा जाफर असेही म्हणाला की, “जसप्रीत बुमराह देखील. त्याने कसोटीत भारताचे नेतृत्व केले. मला आशा आहे की, हे (रोहितला) चांगल्याप्रकारे सांगितले गेले आहे. हे होणार होते, पण या हंगामात थेट होत आहे, ज्यामुळे मी थोडा हैराण आहे.”
“आयपीएल फ्रँचायझीचे नेतृत्व करणे खूपच थकवणारी बाब असू शकते. कारण, तुम्ही दीर्घ काळ या मार्गावर आहात आणि तो आत-बाहेर सर्वांना ओळखतो. मात्र, जेव्हा मुंबईचा खेळ खराब होतो, तेव्हा तुमच्यावरही दबाव येतो. एकप्रकारे, ही थोडी दिलासादायक बाब असेल की, तुम्ही त्या नोकरीत नाहीयेत,” असे जाफर म्हणाला.
“हे थोडे सोपे आहे, तुम्ही फक्त तुमच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे. रोहितला चांगल्याप्रकारे समजल्यानंतर, कधी-कधी आयपीएलमध्ये नेतृत्व करण्याचा ताण त्याच्यावर येतो. खासकरून जेव्हा त्याचा हंगाम खराब असेल. त्याच्यासाठी मागील काही हंगाम खूपच खराब राहिले, ज्याचा फटका त्याच्या फलंदाजीवर स्पष्टपणे दिसतो. त्याची इच्छा असेल की, त्याच्याकडून नेतृत्व हिसकावून घ्यावे, जेणेकरून तो त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करू शकेल,” असेही जाफर रोहितविषयी बोलताना म्हणाला.
जाफरने शेवटी असा निष्कर्ष काढला की, “आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की, तो टी20 विश्वचषकात नेतृत्व करेल की नाही. कारण, तो कर्णधार आहे आणि हार्दिक त्याच्या नेतृत्वाखाली खेळेल, तेव्हा हे कसे होते.”
आयपीएल 2022 आणि 2023 या दोन्ही हंगामात गुजरातने हार्दिकच्या नेतृत्वात साखळी फेरीत गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले होते. एकूणच रोहितने 158 आयपीएल सामन्यात नेतृत्व केले. त्यातील 87 सामन्यात विजय, तर 67 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. तसेच, 4 सामने बरोबरीत सुटले. त्यातील त्याची विजयी टक्केवारी 55.06 इतकी राहिली आहे. (ipl 2024 wasim jaffer surprised that mumbai indians has moved on from rohit sharma)
हेही वाचा-
INDvsSA ODI Series: टीम इंडियाने कसली कंबर, कधी, कुठे आणि कसे पाहता येतील सामने? वेळा घ्या जाणून
हार्दिकच्या ‘या’ अटीपुढे मुंबई इंडियन्सने टेकले गुडघे, मजबुरीने करावा लागला रोहितचा पत्ता कट; जाणून घ्याच