---Advertisement---

CSKसाठी ‘हा’ खेळाडू ठरला नाईटमेयर, हैदराबादचा सोपा विजय!

On: शनिवार, एप्रिल 26, 2025 6:36 AM
---Advertisement---

आयपीएल 2025च्या 43व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा 5 विकेट्सने पराभव केला. या विजयासह, हैदराबादने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत, तर दुसरीकडे, प्लेऑफमध्ये मार्ग चेन्नईसाठी कठीण झाला आहे. हैदराबादने 8 चेंडू शिल्लक असताना हा सामना जिंकला. आयपीएलच्या इतिहासात चेपॉक मैदानावर हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या सीएसकेने एकेकाळी आपला अर्धा संघ 114 धावांवर गमावला होता, त्यानंतर दीपक हुड्डाने 21 चेंडूत 22 धावा करून संघाला 154 धावांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात सीएसकेसाठी डेवाल्ड ब्रेव्हिसने सर्वाधिक 42 धावांची खेळी केली. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद संघाकडून हर्षल पटेलची अद्भुत गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याने सीएसकेच्या 4 फलंदाजांना माघारी पाठवले. हैदराबादच्या विजयात हर्षल पटेलने चमकदार कामगिरी केली.

चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 155 धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली. अभिषेक शर्मा दुसऱ्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. ट्रॅव्हिस हेड (19) आणि ईशान किशनने दुसऱ्या विकेटसाठी 37 धावांची भागीदारी केली. हेन्रिक क्लासेन फक्त 7 धावा करून बाद झाला. 54 धावांपर्यंत हैदराबादने तीन विकेट गमावले होते. ईशान किशनने 34 चेंडूंमध्ये 44 धावा करत डाव सावरला. 106 वर पाच विकेट गेल्यावर कामेंदु मेंडिस (32) आणि नितीश रेड्डी (19) यांनी विजय मिळवून दिला. हैदराबादने 18.4 षटकांत पाच गडी राखून सामना जिंकला. सीएसकेसाठी नूर अहमदने 2, तर खलील अहमद, रवींद्र जडेजा आणि अंशुल कंबोज यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---