आयपीएल 2025च्या तिसऱ्या सामन्यात आज (23 मार्च) मुंबई आणि चेन्नई आमने सामने आहेत. या सामन्यात ऋतुराज गायकवाडने टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना चेन्नईच्या एम ए चिंदबरम चेपाॅक स्टेडियमवर खेळला जात आहे.
MASSIVE CHEER FOR RUTURAJ GAIKWAD AFTER WINNING THE TOSS. 🔥pic.twitter.com/CowJeO3jhs
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 23, 2025
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
चेन्नई सुपर किंग्ज: रुतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, दीपक हुडा, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, सॅम करन, एमएस धोनी (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, नॅथन एलिस, खलील अहमद
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, रॉबिन मिन्झ, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू
दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचे झाल्यास, मुंबई चेन्नई संघात आजपर्यंत एकूण 37 सामने खेळल्या गेल्या आहेत. ज्यात मुंबईने 20 सामने तर सीएसकेने 17 सामने जिंकल्या आहेत. आकडेवारी पाहता मुंबई इंडियन्सचे पारडे जड आहे.