MI vs RCB: आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान मुंबई इंडियन्सला 12 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 5 विकेट गमावून 221 धावा केल्या. प्रत्युत्तरात, मुंबई इंडियन्सना 20 षटकांत 9 गडी गमावून फक्त 209 धावा करता आल्या. अशाप्रकारे, तिलक वर्माचे जलद अर्धशतक आणि हार्दिक पंड्याची धडाकेबाज खेळी वाया गेली. त्याच वेळी, आरसीबी संघाने 10 वर्षांनंतर वानखेडेवर मुंबईला हरवण्यात यश मिळवले. यापूर्वी 2015 मध्ये आरसीबीने मुंबईविरुद्ध विजय मिळवला होता.
तिलक वर्माने 29 चेंडूत 56 धावा केल्या तर कर्णधार हार्दिक पांड्याने 15 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांसह 42 धावा केल्या. एकेकाळी दोघांनीही मुंबईच्या चाहत्यांना विजयाची आशा दिली होती पण जोश हेझलवूडने हार्दिकला बाद करून आरसीबीला सामन्यात परत आणले. हार्दिक पांड्याच्या आऊट होण्याने सामना आरसीबीच्या पारड्यात झुकला. हार्दिकने विस्फोटक खेळी खेळून सामना मुंबईकडे फिरवला होता. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. हार्दिकची विकेट सामन्याची टर्निंग पाँईंट ठरली.
???????????????????????????? ???????????? ???????????? ???????????????????????????? ????
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2025
Phil Salt & Tim David pulled off a game-changing blinder at the ropes! ❤️
Scorecard ▶️ https://t.co/Arsodkwgqg#TATAIPL | #MIvRCB | @RCBTweets pic.twitter.com/gJxRuQGEyV
यानंतर, कृणाल पांड्याने शेवटच्या षटकात 3 विकेट्स घेतल्या आणि आरसीबीचा विजय निश्चित केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून कृणाल पांड्याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर, यश दयाल आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमारला एक यश मिळाले.
A #TATAIPL Classic in every sense ????#RCB hold their nerves to seal a win after 1️⃣0️⃣ years against #MI at Wankhede!
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2025
Scorecard ▶️ https://t.co/ArsodkwOfO#TATAIPL | #MIvRCB | @RCBTweets pic.twitter.com/uu98T8NtWE






