---Advertisement---

हैदराबादचा दारुण पराभव, संघाची गुणतालिकेत घसरगुंडी, लखनऊ टाॅप-2 मध्ये

On: शुक्रवार, मार्च 28, 2025 9:22 AM
---Advertisement---

IPL 2025 Points Table: आयपीएल 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यानंतर पाँईंट टेबलमध्ये बरेच बदल झाले आहेत. आतापर्यंत टेबलमध्ये आघाडीवर असलेला हैदराबाद संघ लखनऊविरुद्ध पराभव पत्करल्याने टॉप पाचमधून बाहेर पडला आहे. एवढेच नाही तर संघाचा नेट रन रेटही मायनसमध्ये गेला आहे. त्याचबरोबर या सामन्यात विजयाचा फायदा लखनऊ संघाला मिळाला आहे. आता लखनऊ संघ पाँईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. लखनऊचा हा दोन सामन्यांतील पहिलाच विजय आहे. पण या सामन्यात त्यांचा नेट रन रेट खूप सुधारला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पाँईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. आरसीबीने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे जो की त्यांनी जिंकला आहे. त्यांचे फक्त दोन गुण आहेत, परंतु त्यांचा नेट रन रेट इतर संघांपेक्षा खूपच चांगला असल्याने संघ टेबल टॉपर आहे. दुसऱ्या क्रमांकावर लखनऊ सुपर जायंट्स आहे, ज्यांचे दोन सामन्यांत एका विजय आणि एका पराभवानंतर दोन गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पंजाब किंग्जचा संघ आहे, ज्याने एक सामना खेळला आहे. चेन्नई सुपर किंग्ज चौथ्या आणि दिल्ली कॅपिटल्स पाचव्या स्थानावर आहेत. या दोन्ही संघांनी त्यांचे पहिले सामने जिंकले आहेत.

आयपीएलमधील पहिल्या पराभवाने सनरायझर्स हैदराबादला सर्वात मोठा धक्का बसला आहे. संघ एका झटक्यात पहिल्या पाच संघांमधून बाहेर पडला आहे आणि सहाव्या क्रमांकावर आला आहे. हैदराबादने दोन सामन्यांपैकी एक जिंकला व दुसरा गमावला आहे. त्याचप्रमाणे केकेआरनेही एक सामना जिंकला आहे आणि एक गमावला आहे. केकेआर दोन गुणांसह सातव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स आठव्या क्रमांकावर आणि गुजरात टायटन्स नवव्या क्रमांकावर आहेत. दोन्ही संघांनी त्यांचे सुरुवातीचे सामने गमावले आहेत. यादीत सर्वात वाईट परिस्थिती राजस्थान रॉयल्सची आहे, ज्याने त्यांचे दोन्ही सामने गमावले आहेत आणि आता ते गुणतालिकेत तळाशी आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---