आयपीएल 2025 पूर्वी एक मेगा लिलाव होणार आहे. यामध्ये अनेक खेळाडूंचे संघ बदलतील. रोहित शर्मा सध्या मुंबई इंडियन्समध्ये आहे. जर संघाने त्याला सोडले तर त्याला या लिलावात मोठी रक्कम मिळेल. रोहितवर अनेक संघांची नजर असेल. यामध्ये पंजाब किंग्जचाही समावेश आहे. पंजाब कर्णधारपदाच्या शोधात आहे आणि त्यासाठी रोहित हा सर्वोत्तम पर्याय असेल. रोहितबाबत पंजाब काय रणनिती करत आहे, यावर संजय बांगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय बांगर पंजाब किंग्जमध्ये हेड ऑफ क्रिकेट जबाबदारी सांभाळत आहेत. एका बातमीनुसार बांगर यांनी रोहितबद्दल सांगितले की, “आम्ही वाट पाहू. मी रोहितसोबत डेक्कन चार्जेससाठी खेळलो आहे. मात्र तेथून तो मुंबईत आला. आता दिशेत बदल झाला आहे. मात्र आता सर्वांची नजर ही रिटेन्शनवर असेल. खेळाडू कायम ठेवण्याबाबत जो अंतिम निर्णय होईल, त्यानंतर पुढील योजना तयार केल्या जातील. संघांमधून रिलिज केलेल्या खेळाडूंबाबत माहिती घेणार आहोत. यानंतर आपल्याला पैशाचीही काळजी घ्यावी लागेल, आमचे बजेट किती आहे.”
रोहित मुंबई इंडियन्स संघाशी दीर्घकाळापासून जोडलेला आहे. 2011 पासून तो संघासोबत आहे आणि त्यानंतर दोन वर्षात तो कर्णधारही झाला. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाचवेळा विजेतेपद पटकावले. 2013 मध्ये मुंबई पहिल्यांदा विजेता बनली होती. यानंतर 2015 आणि 2017 मध्ये स्पर्धा जिंकली. 2019 आणि 2020 मध्येही मुंबईने आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. मात्र, असे असतानाही रोहितला कर्णधारपदावरून हटवण्यात आले. त्याच्या जागी हार्दिक पंड्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले.
कर्णधारपदासोबतच रोहित फलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी करताना दिसतो. रोहितने 257 आयपीएल सामन्यांत 6628 धावा केल्या आहेत. त्याने 2 शतके आणि 43 अर्धशतके झळकावली आहेत. रोहितने गेल्या आयपीएल हंगामात 14 सामने खेळले. यात त्याने 417 धावा केल्या. यात 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावले होते.
हेही वाचा –
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी कर्णधार रोहितने कसली कंबर, सुरू केली खास ट्रेनिंग
राहुल द्रविडच्या मुलाचा फ्लॉप शो जारी, बंगळुरूविरुद्ध संघाचा एकतर्फी पराभव
ठरलं! आयपीएल 2025 पूर्वी पंजाब किंग्ज या 5 खेळाडूंना रिटेन करणार, शिखर धवनचं भविष्य काय?