आयपीएल 2025 च्या 19 व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा संघ विजय मिळवण्यात यशस्वी झाला. कर्णधार शुबमन गिलच्या अर्धशतकाच्या आणि मोहम्मद सिराजच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर गुजरातने सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेट्सने पराभव केला. यासह, गुजरात संघाने विजयाची हॅट्ट्रिक साधली. दुसरीकडे, हैदराबाद संघाला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादला 20 षटकांत 8 गडी गमावून फक्त 152 धावा करता आल्या. गुजरातकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 17 धावा देत 4 बळी घेतले. सिराजने आयपीएलमध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी केली. सिराजने पाॅवरप्लेमध्ये धारदार गोलंदाजी केली. त्याने प्रथम विस्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेडला (09 धावांवर) तंबूत पाठवले. त्यानंतर त्याने 4.4 षटकांत अभिषेक शर्माला (18) देखील बाद केले. सिराजच्या सुरुवातीच्या धक्क्यामुळे हैदराबाद संघाला मोठी धावसंख्या रचता आली नाही. संघ मर्यादित 20 षटकात 155/8 धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला. शिवाय सिराजने अनिकेत वर्मा आणि सिमरजीत सिंग यांनाही बाद केले.
Hyderabad + New ball = Miyan Magic!#MohammedSiraj rocks #SRH early with the big wicket of #TravisHead in the opening over! 👊🏻
— Star Sports (@StarSportsIndia) April 6, 2025
Watch LIVE action ➡ https://t.co/meyJbjwpV0#IPLonJioStar 👉 SRH 🆚 GT | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi, Star Sports 2, Star Sports 2… pic.twitter.com/Vokiul9meR
4️⃣/1️⃣7️⃣ – Best bowling figures ✅
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2025
1️⃣0️⃣0️⃣ #TATAIPL wickets ✅
A sweet homecoming for Mohd. Siraj as he rattles #SRH with a sensational spell! 🔥
Scorecard ▶ https://t.co/Y5Jzfr6Vv4#SRHvGT | @mdsirajofficial pic.twitter.com/cupAsMF0a2
हैदराबादच्याृ 152 धावांच्या प्रत्युत्तरात, गुजरातने 17व्या षटकात केवळ 3 गडी गमावून लक्ष्य गाठले. कर्णधार गिलने (61) शानदार अर्धशतक झळकावले आणि तो नाबाद राहिला.