क्रिकेटच्या खेळात प्रत्येक खेळाडूला आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी लागते. मात्र, संघाच्या सर्व 11 खेळाडूंची कामगिरी प्रत्येक सामन्यात अप्रतिम होणे शक्य नाही. पण प्रत्येक संघात काही खेळाडूंची भूमिका खूप महत्त्वाची असते, ज्यांच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा असतात.
सध्याचे क्रिकेट पाहता प्रत्येक संघासाठी फिनिशरची भूमिका खूप महत्त्वाची ठरत आहे. सामना चांगला संपवण्यासाठी, फिनिशरची भूमिका बजावणाऱ्या खेळाडूंना शेवटच्या षटकांमध्ये कलागुण दाखवत जलद धावा कराव्या लागतात. तो कमी चेंडू खेळून जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे संघाच्या विजयात मदत होते.
आयपीएलच्या 18 व्या हंगामापूर्वी मेगा लिलाव होणार आहे, ज्यामध्ये आरसीबीला आपला संघ मजबूत करण्यासाठी काही चांगल्या खेळाडूंना टार्गेट करावे लागेल. जे फिनिशरची भूमिका बजावू शकतात. चला तर या बातमीद्वारे आम्ही 3 फिनिशर्स बद्दल सांगणार आहोत, ज्यांना आरसीबीने आयपीएल 2025 मेगा मध्ये लक्ष्य केले पाहिजे.
3. आशुतोष शर्मा
आशुतोष शर्माने आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्जकडून पदार्पण केले. या 25 वर्षीय युवा खेळाडूने आपल्या पहिल्याच मोसमात चमकदार कामगिरी केली होती. शशांक सिंगसोबत त्याने पंजाबला काही सामने जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आशुतोष डेथ ओव्हर्समध्ये मोठे फटके खेळण्यात माहीर आहे. जर आरसीबीने त्याला लिलावात खरेदी केले तर त्याचा खूप फायदा होईल कारण बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियम फार मोठे नाही. त्याला या मैदानावर धावा करण्यात फारशी अडचण येणार नाही.
2. लियम लिव्हिंगस्टोन
इंगल्डचा अष्टपैलू लियम लिव्हिंगस्टोन आयपीएल 2022 नंतर पंजाब किंग्जचा भाग आहे. आगमाी मेगा लिलावापूर्वी संघ त्याला रिटेन करण्याची खूपच कमी शक्यता आहे. लिव्हिंगस्टोन जर मेगा लिलावात आला तर आरसीबीने त्याला नक्कीच टार्गेट केले पाहिजे. लिव्हिंगस्टोन किती खतरनाक फलंदाज आहे. ते वेगळे सागण्याची गरज नाही. जर तो आरसीबी संघात सामिल झाल्यास संघ आणखी मजबूत होईल. त्याच्याकडे जगभरातील वेगवेगळ्या टी20 लीगमध्ये खेळण्याचा अनुभव आहे, ज्याचा फायदा आरसीबीला होऊ शकतो.
1. ग्लेन फिलिप्स
न्यूझीलंडचा यष्टिरक्षक फलंदाज ग्लेन फिलिप्सला अद्याप आयपीएलमध्ये आपला ठसा उमटवण्यात यश आलेले नाही. पण टी20 इंटरनॅशनलमध्ये त्याचा रेकॉर्ड खूपच जबरदस्त आहे. फिलिप्सने किवी संघाकडून दोन शतकी खेळीही खेळली आहे. मेगा लिलावात फिलिप्स येणार हे नक्की. त्याला खरेदी करण्यासाठी आरसीबीला मोठी रक्कम खर्च करावी लागणार नाही.
हेही वाचा-
पाकिस्तानची शरणागती; बांग्लादेशचा सामन्यावर मजबूत पकड, विजयाच्या अगदी जवळ
“शिखर, तू नेहमीच आठवणीत राहणार”, गब्बरसाठी क्रिकेटच्या देवाचा खास मॅसेज
जो रूटने मोडला राहुल द्रविड-ॲलन बॉर्डरचा मोठा विक्रम, लवकरच रचणार इतिहास