काल (24 नोव्हेंबर) रविवारी जेद्दाहमध्ये आयपीएल 2025 मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी 84 खेळाडूंचा लिलाव झाला. त्यापैकी 72 खेळाडूंना खरेदीदार मिळाले. तर 12 खेळाडू अनसोल्ड राहिले. लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्व फ्रँचायझींनी मिळून 467.95 कोटी रुपये खर्च केले. ज्यामध्ये सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू रिषभ पंत ठरला त्याला लखनऊ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपयांना विकत घेतले.
आज 25 नोव्हेंबर हा मेगा लिलावाचा दुसरा आणि शेवटचा दिवस असेल. अनेक मोठे खेळाडू अद्याप लिलावात उतरलेले नाहीत आणि फ्रँचायझीने दुसऱ्या दिवसासाठीही रणनीती आखली आहे. आयपीएल 2025 मेगा लिलावाच्या पहिल्या दिवसानंतर कोणत्या फ्रँचायझीकडे सर्वात जास्त पैसे शिल्लक आहेत आणि खेळाडूंकडे किती स्लॉट आहेत ते जाणून घेऊयात.
1. मुंबई इंडियन्स: मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी मुंबई इंडियन्सने 18.90 कोटी रुपये खर्च केले. आता फ्रँचायझीच्या पर्समध्ये 26.10 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्याचबरोबर खेळाडूंसाठी 9 स्लॉट उपलब्ध आहेत.
2. कोलकाता नाइट रायडर्स: गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सने पहिल्या दिवशी 40.95 कोटी रुपये खर्च केले. आता त्यांच्याकडे 10.05 कोटी रुपये शिल्लक आहेत. तर केकेआरकडे 12 स्लॉट शिल्लक आहेत.
3. चेन्नई सुपर किंग्स: पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या सीएसकेने पहिल्या दिवशी 39.40 कोटी रुपये खर्च केले. फ्रेंचायझीकडे अद्याप 15.60 कोटी रुपये शिल्लक आहेत. चेन्नई संघात 12 जागा शिल्लक आहेत.
4. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर: आरसीबीने 52.35 कोटी रुपये खर्च केले आहेत. दरम्यान त्यांच्या पर्समध्ये आता 30.65 कोटी रुपये शिल्लक आहेत. बेंगळुरूकडे 9 स्लॉट आहेत.
5. सनरायझर्स हैदराबाद: एसआरएचने 39.85 कोटी रुपये खर्च केले. आता त्याच्याकडे फक्त 5.15 कोटी रुपये शिल्लक आहेत. हैदराबाद संघात 13 जागा शिल्लक आहेत.
6. लखनऊ सुपर जायंट्स: लखनऊ सुपर जायंट्सने लिलावाच्या पहिल्या दिवशी भरपूर पैसे खर्च केले. आता फ्रँचायझीकडे 14.85 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्याचबरोबर संघात 12 स्लॉट शिल्लक आहेत.
7. राजस्थान रॉयल्स: आयपीएलच्या उद्घाटन हंगामाच्या विजेत्या राजस्थान रॉयल्सने 23.65 कोटी रुपये खर्च केले. आता त्यांच्या पर्समध्ये 17.35 कोटी रुपये आहेत. तर 11 स्लॉट शिल्लक आहेत.
8. पंजाब किंग्स: पंजाब किंग्सने लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक 88 कोटी रुपये खर्च केले. फ्रँचायझीकडे अद्याप 22.50 कोटी रुपये शिल्लक आहेत. तर संघात 12 स्लॉट शिल्लक आहेत.
9. गुजरात टायटन्स: गुजरात टायटन्सने 51.50 कोटी रुपये खर्च केले. फ्रेंचायझीची उर्वरित रक्कम 17.50 कोटी रुपये आहे. तर संघात14 स्लॉट आणखी शिल्लक आहेत.
10. दिल्ली कॅपिटल्स: दिल्लीने पहिल्या दिवशी 59.20 कोटी रुपये खर्च केले. आता त्यांच्याकडे 13.80 कोटी रुपये शिल्लक आहेत. तर संघात खेळाडूंसाठी 13 स्लॉट आहेत.
हेही वाचा-
अवघ्या 7 धावांत संपूर्ण संघ ऑलआऊट! टी20 क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्या
IPL 2025 Mega Auction: पहिल्याच दिवशी या 4 संघांना मिळाले त्यांचा नवा कर्णधार!
अब्दुल समदपासून नेहाल वढेरापर्यंत, मेगा लिलावात या अनकॅप्ड खेळाडूंना मिळाले कोट्यावधी रुपये!