चेन्नई सुपर किंग्स संघाला रविवारी (दि. 28 मे) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी मोठा झटका बसला. सीएसके संगाचा मुख्य फलंदाज अंबाती रायुडू याने अंतिम सामन्यापूर्वी आयपीएल निवृत्तीची घोषणा करत सर्वांच्या भुवया उंचावल्या. गुजरात टायटन्स संघाविरुद्ध रायुडू आयपीएल कारकीर्दीचा अखेरचा सामना खेळेल. प्रत्येक खेळाडूप्रमाणे रायुडूनेही त्याच्या कारकीर्दीत अनेक समस्यांचा सामना केला आहे.
अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याने मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाकडून 2010मध्ये आयपीएल (IPL) पदार्पण केले होते. तो मुंबईकडून 2010 ते 2017 हंगामात खेळला. त्यानंतर त्याने 2018मध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघात एन्ट्री केली. त्याने सीएसके (CSK) संघाला अनेकदा आपल्या दमावर सामना जिंकून दिला होता. अशात या लेखातून आपण रायुडूने चेन्नईसाठी खेळलेल्या सर्वोत्तम 5 खेळींविषयी जाणून घेऊयात.
आयपीएलमधील रायुडूच्या 5 सर्वोत्तम खेळी
1. आयपीएल 2021 (चेन्नई वि. मुंबई)
आयपीएलच्या 14व्या हंगामात अंबाती रायुडू याने मुंबई इंडियन्सविरुद्ध 7 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 72 धावा केल्या होत्या. त्याने त्याचा जुना संघ असलेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध मॅच विनिंग खेळी साकारली होती.
2. आयपीएल 2017 (मुंबई वि. कोलकाता)
अंबाती रायुडू आयपीएल 2017मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. त्यावेळी त्याने अक्षरश: राडा घातलेला. त्याने 46 चेंडूत 63 धावांचा पाऊस पाडलेला. ही त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक राहिली. या हंगामात त्याच्या बॅटमधून फार धावा निघाल्या नव्हत्या, पण त्याने या खेळीने सर्वांना प्रभावित केले होते.
3. आयपीएल 2018 (चेन्नई वि. हैदराबाद)
रायुडूसाठी आयपीएल 2017 हंगाम खराब ठरला असला, तरीही त्याने पुढच्या हंगामात बॅटमधून धावांचा पाऊस पाडला होता. त्याने आयपीएल 2018मध्ये एकूण 602 धावा केल्या होत्या. या हंगामात त्याने त्याच्या कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले होते. हे शतक चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आले होते.
4. आयपीएल 2016 (मुंबई वि. पंजाब)
अंबाती रायुडूने आयपीएल 2016मध्ये मोहालीत खेळल्या गेलेल्या एका सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पंजाब किंग्सविरुद्ध शानदार कामगिरी केली होती. त्याने त्या सामन्यात पार्थिव पटेल याची चांगली साथ दिली होती. त्याने 37 चेंडूत 65 धावा केल्या होत्या. तसेच, त्याच्या खेळीच्या जोरावर मुंबईला 189 धावांचा डोंगर उभारण्यात मदत झाली होती.
5. आयपीएल 2012 (मुंबई वि. बेंगलोर)
आयपीएल 2012मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून रायुडूने बॅटमधून शानदार कामगिरी केली होती. त्याने मुंबईकडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध 54 चेंडूत नाबाद 81 धावांची खेळी साकारली होती. त्याच्या खेळीमुळे मुंबईने 5 विकेट्सने सामना जिंकला होता. या हंगामात त्याने 17 सामन्यात 333 धावा केल्या होत्या. (ipl ambati rayudu top 5 innings and stats in ipl retirement chennai super kings vs gujarat titans read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सचिनने धोनीला केले सावधान! गिलचे तोंडभरून कौतुक करत म्हणाला, ‘त्याचा गजबचा संयम, धावांची भूक…’
आधी मिठी, नंतर जर्सीवर ऑटोग्राफ! घरी परतण्यापूर्वी Mumbai Indiansचे खेळाडू भावूक, Video व्हायरल