इंडियन प्रीमीयर लीग २०२२ (IPL 2022) हंगामाचे बिगूल वाजले असून आता लिलावात असणाऱ्या अंतिम खेळाडूंची यादीही जाहीर झाली आहे. आयपीएल २०२२ लिलावासाठी तब्बल १२१४ खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. पण, आता ५९० खेळाडूंची लिलावासाठी अंतिम निवड करण्यात आली आहे. या शॉर्टलिस्ट झालेल्या खेळाडूंमध्ये २ कोटींची मूळ किंमत असलेले ४८ खेळाडू आहेत. तर २० खेळाडूंनी त्यांची मूळ किंमत १.५ कोटी ठेवली आहे. तसेच ३४ खेळाडू १ कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरतील. (IPL 2022 Player Auction list announced)
२ कोटी मूळ किंमत असलेले खेळाडू (2 Crore Base Price Players)
सर्वाधिक २ कोटींच्या मूळ किंमतीसह मेगा लिलावात उतरणारे खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत-
ऍडम झम्पा, आदिल राशिद, अंबाती रायुडू, ऍश्टन एगर, भुवनेश्वर कुमार, ख्रिस जॉर्डन, क्रेग ओव्हरटन, डेविड वार्नर, डेविड विले, दीपक चाहर, देवदत्त पडीक्कल, दिनेश कार्तिक, ड्वेन ब्रावो, एविन लुईस, फॅबियन एलन, फाफ डू प्लेसिस, हर्षल पटेल, इमरान ताहिर, इशान किशन, जेम्स विंस, जेसन रॉय, जोस हेजलवुड, कागिसो रबाडा, कृणाल पांड्या, लॉकी फर्ग्यूसन, मर्चंट डिलेंगे, मार्क वुड, मॅथ्यू वेड, मिचेल मार्श, मोहम्मद शमी, मुस्ताफिजुर रेहमान, नाथन कूल्टर नाइल, ओडियन स्मिथ, पॅट कमिन्स, क्विंटन डि कॉक, रॉबिन उथप्पा, सॅम बिलिंग्स, शाकिब महमूद, शाकिब अल हसन, शार्दुल ठाकुर, शिखर धवन, श्रेयस अय्यर, स्टिव्ह स्मिथ, सुरेश रैना, ट्रेंट बोल्ट, उमेश यादव, युजवेंद्र चहल, मुजीब जारदान आणि आर अश्विन.
लिलावासाठी अंतिम निवड झालेल्या खेळाडूंचा तपशीलवार
आयपीएल २०२२ लिलावासाठी अंतिम निवड झालेल्या ५९० खेळाडूंपैकी २२८ खेळाडू किमान एक तरी आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले म्हणजे कॅप खेळाडू आहेत. तसेच ३५५ अनकॅप खेळाडू म्हणजेच अजून आंतरराष्ट्रीय पदार्पण न झालेले खेळाडू आहेत. याबरोबरच ७ खेळाडू सहयोगी देशातील आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बेंगलुरू बुल्स’ने नोंदवला हंगामातील आठवा विजय, ‘यूपी योद्धां’ना ३१-२६ ने चारली धूळ
चेन्नईयन एफसी अव्वल चौघांत स्थान पटकावण्यासाठी प्रयत्नशील, दुबळ्या ईस्ट बंगालचे आव्हान
वेस्ट इंडिजचा संघ भारतासाठी रवाना; होल्डरने रणसिंग फुंकत म्हटले, ‘इंडियात विजय मिळवणं अशक्य नाही’