आयपीएल 2025 च्या तयारीला सुरुवात झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळच्या आधिकाऱ्यांची आयपीएल संघ मालकांसोबत बैठक सुध्दा झाली आहे. आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलावाचे आयोजन होणार आहे. वानखेडे येथे झालेल्या बैठकीमध्ये अनेक फ्रँचायझीने आपले आपले प्रस्ताव मांडले आहेत. ज्यापैकी सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकिण काव्या मारनच्या सूचनेने सर्वांना आश्चर्यचकित केले. ती खूप आक्रमक अंदाजात पहायला मिळाली.
सनरायझर्सची मालकीण काव्या मारनने आयपीएल 2025 पूर्वी प्रत्येक संघासाठी खेळाडू राखून (कायम) ठेवण्याच्या संख्येत वाढ करण्याचे समर्थन केले. ती म्हणाली की प्रत्येक संघाकडे किमान सहा रिटेन्शन किंवा सहा आरटीएम (राईट टू मॅच) पर्याय असावेत. काव्या मारन यांनी सुचवले की ते चार रिटेन्शन्स आणि दोन आरटीएम, किंवा सर्व सहा रिटेन्शन्स किंवा सर्व सहा आरटीएम म्हणून वापरले जाऊ शकतात. खेळाडूशी झालेल्या चर्चेच्या आधारे रिटेन्शन किंवा आरटीएम वापरण्याचा पर्याय फ्रँचायझीकडे असायला हवा, असे तिचे मत आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, काव्या मारन म्हणाल्या की, यापूर्वीही अशी अनेक उदाहरणे पाहिली आहेत की काही खेळाडूंना लिलावात जायचे आहे. त्यांना रिटेंशनमध्ये फार कमी पैसे मिळाले आहेत असे वाटते. त्याचबरोबर काही खेळाडूंना आधी कायम ठेवायचे आहे. जर टिकवणे शक्य नसेल तर आम्ही त्या खेळाडूला लिलावात विकल्या गेलेल्या किंमतीवर आरटीएमद्वारे आमच्या संघात ठेवू शकतो.
पुढे बोलताना काव्या म्हणाली, आश्या खेळाडूंवर देखील कारवाई व्हायला पाहिजे जे लिलावामध्ये विकल्यानंतर आयपीएल हंगामापूर्वी आपली नावे मागे घेतात आणि संपूर्ण स्पर्धेत खेळत नाहीत. आश्या खेळाडूंवर दोन वर्ष बंदी घालण्यात यावी आशी मागणी देखीलबीसीसीआय समोर केली आहे. मात्र गंभीर जखमी झालेल्या खेळाडूंनाच सूट मिळावी. असंही ती पुढे म्हणाली.
आयपीएलद्वारे आयोजित केलेल्या बैठकीत अनेक संघांनी मेगा लिलावाला विरोध दर्शवला आहे. तर काही संघांनी समर्थन दाखवले आहे. बीसीसीआय लवकरच या मुद्यावर निर्णय जाहीर करु शकते. बीसीसीआयच्या या निर्णयावर चेन्नई सुपरकिंग्जचा माजी कर्णधार एम एस धोनी आयपीएल 2025 खेळणार का नाही? हे दडलं आहे
हेही वाचा-
क्रिकेटचा थरार होणार डबल! भारतातील या शहरात बांधण्यात येणार आणखी एक आंतरराष्ट्रीय स्टेडियम
फक्त 24 धावा करुन कोहलीनं रचला इतिहास! ‘या’ दिग्गज खेळाडूला टाकलं मागेॉ
भारतानं दोनच वनडे विश्वचषक जिंकले, मग जर्सीवर तीन स्टार्स कसे?