---Advertisement---

गजब विकेटकिपिंग! पुन्हा दिसली धोनीची हुशारी, आपल्या ट्रेडमार्क शैलीने फलंदाजाला केले यष्टीचीत; पाहा व्हिडिओ

On: गुरूवार, एप्रिल 8, 2021 11:59 PM
---Advertisement---

येत्या 9 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या 14 व्या हंगामाची आठही संघांनी जय्यत तयारी केली आहे. यामध्ये तीन वेळा आयपीएल विजेता राहिलेला चेन्नई सुपर किंग्ज संघ देखील मागील सत्रातील अपयश विसरून यंदाच्या सत्रात नव्याने प्रारंभ करणार आहे.

तत्पुर्वी चेन्नई सुपरकिंग्ज संघाने बुधवारी(7 एप्रिल) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा आणि ड्वेन ब्राव्हो सारखे दिग्गज खेळाडू खेळपट्टीवर खेळताना दिसत आहेत. कसोटी स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा देखील जोरदार फटके मारताना दिसत आहे.

या 148 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये धोनी फलंदाजी सोबतच यष्टिरक्षण करतानाही दिसला आहे. फलंदाजी करताना त्याने स्क्वेअर कटसह मोठे शॉट्स लावल्याचे दिसत आहे. फलंदाजी झाल्यानंतर त्याने यष्टिरक्षकाच्या भूमिकेस सुरूवात केली, त्यामध्ये त्याने फलंदाजाला चकवत ट्रेडमार्क शैलीचा वापर करत फलंदाजाला यष्टीचीत केल्याचेही दिसले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रैना आणि धोनी प्रथमच या व्हिडिओत एकत्र फलंदाजी करताना दिसले आहेत. काही वैयक्तिक कारणास्तव मागील आयपीएल सत्रातून रैनाने माघार घेतली होती. मात्र, यंदाच्या आयपीएलसाठी रैनाने जोरदार तयारी केली आहे. आपल्या क्रिकेट सरावाचे अनेक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केले आहेत.

आयपीएल 2020 मध्य प्लेेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या चेन्नई संघाला गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. परंतु यंदा मात्र चेन्नई सुपर किंग्ज आपल्या खेळीत सुधारणा करण्यास उत्सुक असून त्यांचा आयपीएलच्या 14 व्या सत्रातील पहिला सामना 10 रोजी दिल्ली कॅपिटल विरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

आरसीबी संघात सामील झाल्याने ग्लेन मॅक्सवेलचे ‘हे’ मोठे स्वप्न होणार पूर्ण

आयपीएल २०२१: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची साथ सोडणार? पाहा विराट कोहलीने काय दिले उत्तर

चेन्नईने ज्या खेळाडूला संघाबाहेर केले, ‘तो’ मुंबई इंडियन्सला मिळवून देऊ शकतो ६ वे विजेतेपद, रोहित शर्माला विश्वास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---