इंडियन प्रीमियर लीगचे 13 वा हंगाम दिल्ली कॅपीटल्स संघासाठी अविस्मरणीय असणार आहे. 12 हंगामांचा प्रतीक्षेनंतर दिल्लीचा संघ अखेर प्रथमच अंतिम सामन्यात प्रवेश करण्यास यशस्वी झाला. संघाच्या या महान यशाने सर्व चाहते आणि खेळाडू आनंदी आहेत. दुखापतीमुळे भारतात परतलेला दिल्लीचा फिरकीपटू अमित मिश्रा खास अंतिम सामना पाहण्यासाठी दुबईला रवाना झाला आहे.
आयपीएलच्या 13 व्या हंगामातील अंतिम सामना दिल्ली आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणार आहे. आजचा महामुकाबला दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून खेळला जाईल. दिल्ली संघातील लोक व चाहते मुंबई संघापेक्षा या सामन्याबद्दल अधिक उत्सुक आहेत. संघाने स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला आहे. संघाचे दिग्गज फिरकीपटू अमित मिश्रा याने खास करून या सामन्यासाठी दिल्लीहून दुबईला उड्डाण घेतले असल्याची माहिती त्याने स्वतः दिली आहे.
दिल्लीतील अंतिम सामना पाहण्यासाठी अमितने समाज माध्यमावर माहिती दिली. त्याने एक फोटो शेअर केला ज्यात त्याने म्हटले आहे की, “मी माझ्या टीम दिल्ली कॅपिटल खेळाडूंना समर्थन देण्यासाठी दुबईला जात आहे. अंतिम सामन्यात माझ्या संघाने धडक दिल्याने मला माझ्या संघाचा अभिमान वाटत आहे. तुम्ही सर्वांनीसुध्दा त्यांना पाठिंबा द्यावा ही विनंती करतो आणि आपण देत असलेले प्रेम आपण नेहमीच टिकवून ठेवावे अशी इच्छा आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
AUS vs IND : आता मैदानात घुमणार प्रेक्षकांचा गजबजाट; ऑस्ट्रेलिया क्रिकेटने केली मोठी घोषणा
IPL FINAL : धवन, पंत, हेटमायर सारख्या डावखुऱ्या फलंदाजांसाठी मुंबई ‘हा’ गोलंदाज उतरवणार मैदानात
IPL – फायनलपूर्वी सचिन तेंडुलकरचा मुंबईला खास संदेश, प्रत्येक खेळाडूला ‘ही’ गोष्ट समजायला हवी
ट्रेंडिंग लेख-
चौथी शिकलेल्या पोराच्या फिरकीपुढे भल्याभल्यांनी घेतलीये गिरकी; वाचा मुंबईच्या प्रमुख फिरकीपटूबद्दल
विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय