fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कोरोना बाधितांना मदत करणारी ही ठरली पहिली आयपीएल टीम

कोराना व्हायरसचे वाढते संकट पहाता अनेकांनी मदतीचे हात पुढे केले आहेत. यात अनेक क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. पण आता क्रिकेटपटूंबरोबरच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची सहमालकी असलेला कोलकाता नाईट रायडर्स संघही कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे.

याबद्दलची कोलकाता नाईट रायडर्सच्या सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर एक प्रसिद्धीपत्रकही या पोस्टमधून जाहीर करण्यात आले आहे.

या पोस्टला कॅप्शन दिले आहे की ‘जेव्हा आपण सर्व आपल्या घरात सुरक्षित असतो, तेव्हा असे बरेच लोक आहेत जे आपल्या सुरक्षेसाठी काम करीत आहेत. त्यांना निरोगी ठेवण्यासाठी आमचे हे छोटेसे योगदान आहे. एकत्र येऊन या आजाराशी आपण लढू शकतो.’

त्याचबरोबर जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात माहिती दिली आहे की शाहरुख खान ग्रुपच्या कंपनी – कोलकाता नाईट रायडर्स, रेड चिली एंटरटेनमेंट, मीर फाऊंडेशन आणि रेड चीली व्हीएफएक्स या कंपनी मिळून पंतप्रधान सहाय्यता निधी, महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधी, तसेच विविध फाऊंडेशन्सला मदत करणार आहेत. त्याचबरोबर आरोग्य सेवा कामगारांसाठी सुरक्षा किटही देण्यात येणार आहे.

तसेच कोलकाता नाईट रायडर्सचे सहसंघमालक शाहरुख खान, जूही चावला, गौरी खान आणि जय मेहता या मदतीमध्ये योगदान देण्यास वचनबद्ध असतील असेही सांगण्यात आले आहे.

भारतात सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या २००० हून अधिक झाली आहे. तसेच ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. १५० हून अधिक लोक या आजारातून बरे होऊन घरी परतले आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी – 

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने केले महाराष्ट्र सरकारचे जोरदार कौतूक

कोरोना बाधीतांच्या मदतीसाठी कुणाला माहित होऊ न देता दान करणारे ४ क्रिकेटपटू

आयपीएलबद्दलची ही आहे सर्वात मोठी बातमी, जाणून घ्या कधी होणार आयपीएल

You might also like