सचिन तेंडुलकर व्हायरल व्हिडिओ: आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल मीडियावर माजी भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, मास्टर ब्लास्टर नेटमध्ये फलंदाजी करताना दिसत आहे. वास्तविक, सचिन तेंडुलकर मास्टर्स क्रिकेट लीग स्पर्धेसाठी नेटमध्ये घाम गाळत आहे. ही स्पर्धा 22 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तर, मास्टर्स क्रिकेट लीग स्पर्धेचा अंतिम सामना 16 मार्च रोजी खेळला जाईल. सचिन तेंडुलकर व्यतिरिक्त, इतर दिग्गज क्रिकेटपटूंनी या स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे.
पाहा व्हिडिओ-
𝗦𝗮𝗰𝗵𝗶𝗻 𝗧𝗲𝗻𝗱𝘂𝗹𝗸𝗮𝗿 started the practice for IMLT20 💥
Just 18 Days to go pic.twitter.com/nVFBXhEp9f
— 𝑺𝒉𝒆𝒃𝒂𝒔 (@Shebas_10dulkar) February 4, 2025
सचिन तेंडुलकरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय, चाहते सतत कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला पुन्हा नेटमध्ये पाहून क्रिकेट चाहते खूप आनंदी झाले.
मास्टर्स क्रिकेट लीग स्पर्धेत भारताव्यतिरिक्त श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजसारखे संघ खेळतील. ब्रायन लारा वेस्ट इंडिजचे नेतृत्व करेल. तर माजी दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकारा श्रीलंकेचा नेतृत्व करताना दिसेल. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व जॅक कॅलिसकडे असेल. इऑन मॉर्गन इंग्लंड संघाचे नेतृत्व करताना दिसेल. ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व अष्टपैलू शेन वॉटसन करेल. मास्टर्स क्रिकेट लीग स्पर्धा 22 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तर स्पर्धेचा अंतिमा सामना 16 मार्च रोजी खेळला जाईल. याशिवाय सुनील गावस्कर यांना मास्टर्स क्रिकेट लीग स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आले आहे.
हेही वाचा-
Champions Trophy; ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्का.! संघाचा कर्णधार स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता
वर्ल्ड रेकाॅर्ड..! वयाच्या 26 व्या वर्षी रशीद खानने घेतले सर्वाधिक टी20 विकेट्स, ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडित
डेव्हिड मिलरने रचला इतिहास, एबी डिव्हिलियर्स-फाफ डु प्लेसिस जवळपासही नाही