---Advertisement---

संचारबंदीच्या काळात मुंबईत होणार आयपीएलचे सामने? पाहा काय आहे सरकारचा निर्णय

MI vs CSK (MS Dhoni and Rohit Sharma)
---Advertisement---

जगातील अनेक देशांप्रमाणेच भारतासमोरही सध्या कोरोनाचे वाढते संकट आहे. परंतु, या संकटातही क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट अशी की इंडियन प्रीमीयर लीगचा चौदावा हंगाम भारतात खेळला जाणार आहे. मात्र, याचवेळी महाराष्ट्रात कोरोनाची सर्वाधिक संख्या आहे, त्यामुळे आयपीएलचे सामने महाराष्ट्रात होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण आता याबाबत महाराष्ट्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

खरंतर, महाराष्ट्रात कोरोना प्रकरण वाढत असताना महाराष्ट्र सरकारने सायंकाळी 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. ही संचारबंदी 15 एप्रिलपर्यंत राहणार आहे. अशा परिस्थितीत मुंबईतील आयपीएल सामन्यांबाबत प्रश्न उपस्थित होत होते. संचारबंदीच्या नवीन नियमांनुसार रात्री आठ ते सकाळी सात या काळात पाच किंवा अधिक लोकांना एकत्र येण्याची परवानगी दिली जाणार नाही.

कोरोनामुळे पुण्यात होणाऱ्या भारत आणि इंग्लंडच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यावर याचा परिणाम होईल का? तसेच, आयपीएल दरम्यान खेळाडू सराव करतील पण संचारबंदीचे नवीन नियम यात अडथळा ठरू शकतात का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

पण, महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन सचिव असीम गुप्ता म्हणाले की, सामने बंद दरवाजा मागे खेळले जातील. तसेच सामन्यादरम्यान प्रेक्षक मैदानात येऊ शकणार नाहीत. तसेच खेळाडू आणि कर्मचारी बायो बबलमध्ये राहत आहेत. त्यामुळे खेळासंबधींत गोष्टींना या नियमातून वगळण्यात आले आहे.

असीम गुप्ता म्हणाले की, खेळादरम्यान कोणत्याही प्रकारची गर्दी जमणार नाही. प्रेक्षकांशिवाय सामने आयोजित करण्यास अनुमती दिली जाईल. बायो बबल दरम्यान कोणत्याही बाहेरील लोकांना खेळाडूंना किंवा कर्मचार्‍यांना भेटण्याची परवानगी दिली जाणार नाही. आयपीएलचे 10 सामने मुंबईत खेळले जाणार आहेत चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज हे संघ मुंबईतील वानखेडे मैदानावर सराव करतील. हे संघ त्यांच्या सामन्यापूर्वी वानखेडे मैदानावर सराव करण्यासाठी जातील.

कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. आयपीएलच्या सामन्यांमधील दुसरी चिंता म्हणजे ही सामने सायंकाळी 7:30 वाजता सुरू होतील, म्हणजे संचारबंदीच्या वेळेच्या बरोबर आधी सुरू होतील. त्यामुळे बीसीसीआय आधीपासूनच दुसर्‍या ठिकाणाच्या शोधात होती. परंतु, सरकारने स्वतः या प्रकरणात स्पष्टीकरण दिल्यानंतर सामन्यांबाबतची अनिश्चितता संपुष्टात आली आहे. शनिवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 36902 रुग्ण आढळले आहेत. तर 112 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल २०२१: राजस्थान रॉयल्ससाठी आनंदाची बातमी; ‘हा’ गोलंदाज लवकरच होतोय संघात सामील

INDvENG 3rd ODI: हार्दिक, रिषभचे आक्रमक अर्धशतक; सर्वबाद होऊनही भारताने दिले इंग्लंडला ३३० धावांचे मोठे आव्हान

शार्दुलने ठोकला खणखणीत षटकार, गोलंदाजी करत असलेल्या स्टोक्सने चेक केली बॅट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---