यंदाचा आयपीएल मेगा लिलाव जेद्दाहमध्ये दोन दिवस चालला. 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी खेळाडूंवर बोली पार पडली. ज्यात सुमारे 200 खेळाडूंचे नशीब उजळले. ज्यामध्ये आयपीएलच्या 10 संघांनी मोठी खरेदी केली. मात्र, अजूनही बरेच संघ आहेत, ज्यात जास्तीत जास्त खेळाडू नाहीत. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावानंतर प्रत्येकी 25 खेळाडूंचे संघ असलेले फक्त तीन संघ आहेत. तथापि, सर्व 10 संघांमध्ये 18 किंवा त्याहून अधिक खेळाडू आहेत. प्रत्येक संघाचा संघ किमान 18 खेळाडूंचा असावा. सर्व संघांनी ही मर्यादा ओलांडली आहे. परंतु सर्व संघांकडे लाखो रुपये शिल्लक आहेत.
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावानंतर केवळ पाच वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांनी प्रत्येकी 25 खेळाडूंचा संघ तयार केला आहे. त्याचबरोबर लखनऊ सुपर जायंट्सने 24 खेळाडूंचा संघ तयार केला आहे. याशिवाय मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सने प्रत्येकी 23 खेळाडूंचा संघ बनवला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीने आपल्या संघात 22 खेळाडूंची निवड केली आहे. तीन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सने 21 खेळाडूंचा संघ बनवला आहे. या लिलावानंतर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सने प्रत्येकी 20 खेळाडूंचा संघ तयार केला आहे.
आयपीएल मेगा लिलावानंतर खेळाडूंचा संघ
25-25 खेळाडू – चेन्नई, गुजरात आणि पंजाब
23-23 खेळाडू – मुंबई आणि दिल्ली
21 खेळाडू – कोलकाता, हैदराबाद आणि राजस्थान
मेगालिलाव संपल्यानंतर सर्व संघांच्या पर्समध्ये अजूनही काही रक्कम शिल्लक आहे. मेगा लिलावानंतरची सर्वात मोठी पर्स आरसीबीची आहे. 22 खेळाडूंना खरेदी करणाऱ्या आरसीबीकडे 75 लाख रुपये शिल्लक आहेत. 25 खेळाडू खरेदी करूनही पंजाबकडे 35 लाख रुपये शिल्लक आहेत. 20 खेळाडूंना खरेदी करण्यासाठी राजस्थानकडे 30 लाखांची रक्कम आहे. तर दिल्ली, मुंबई आणि हैदराबादकडे प्रत्येकी 20 लाख रुपयांची पर्स शिल्लक आहे. 15 लाख गुजरात टायटन्सकडे आहेत. तर 10 लाख लखनऊकडे आहेत. केकेआर आणि सीएसकेच्या पर्समध्ये फक्त 5-5 लाख रुपये शिल्लक आहेत.
आयपीएल मेगा लिलावानंतर पर्स बाकी
75 लाख रुपये – आरसीबी
35 लाख रुपये – पंजाब किंग्ज
30 लाख रुपये – राजस्थान
15 लाख रुपये – गुजरात
10 लाख रुपये – लखनऊ
20-20 लाख रुपये – दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद
5-5 लाख रुपये – केकेआर आणि सीएसके
हेही वाचा-
ऑस्ट्रेलियन संघात फूट पडली? जोश हेझलवूडच्या विधानानं खळबळ!
दिल्लीसोबतचं नातं संपल्यानंतर रिषभ पंतची भावनिक पोस्ट, चाहत्यांना उद्देशून म्हणाला…
लिलावात करोडपती झालेल्या 13 वर्षीय खेळाडूवर वयाच्या फसवणुकीचा आरोप