---Advertisement---

तुझं कौतुक करावं तेवढं कमी! रोहित शर्माच्या ‘त्या’ कृत्याला पाहून तुम्हीही असंच म्हणाल

On: शनिवार, नोव्हेंबर 7, 2020 8:24 AM
---Advertisement---

रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२०च्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. गुरुवारी (५ नोव्हेंबर) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या क्वालिफायर १ सामन्यात मुंबईने ५७ धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागातील मुंबईच्या सांघिक कामगिरीमुळे हे साध्य झाले. परंतु, मुंबईचा फिरकीपटू राहुल चाहरने या सामन्यात अत्यंत महागडी गोलंदाजी केली. तरीही कर्णधार रोहितने सामन्याअखेर मैदानाबाहेर जाताना मन जिंकणारे कृत्य केले.

काय केले नक्की रोहितने?

या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली होती. पण मुंबईच्या फलंदाजांनी अय्यरच्या या निर्णयाला चूकीचे ठरवत दिल्लीपुढे २०१ धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर दिल्लीच्या डावात मुंबईचे गोलंदाज जसप्रीत बुमराह (१४ धावा ४ विकेट) आणि ट्रेंट बोल्टने (९ धावा २ विकेट) कमालीचे गोलंदाजी प्रदर्शन केले. तर दूसऱ्या बाजूला राहुल चाहरने दिल्लीच्या डावात २ षटके टाकत तब्बल ३५ धावा दिल्या. दरम्यान त्याला एकही विकेट घेता आली नाही.

अखेर सामना जिंकल्यानंतर मुंबई संघातील सर्व खेळाडू जमावाने ड्रेसिंग रुमकडे जात होते. त्यावेळी सर्वांच्या पुढे चालत असलेल्या रोहितने चाहरला बोलावले आणि त्याला आपल्या संघातील इतर खेळाडूंना नेतृत्त्व करत (मार्ग दाखवत) ड्रेसिंग रुमपर्यंत न्यायला सांगितले. अर्थातच रोहितने चाहरला निराश न होण्याचा सल्ला दिला. त्यांचा तो व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चाहत्यांनी रोहितच्या त्या कृत्याची तोंडभरून प्रशंसा केली आहे.

https://twitter.com/smart_ukkasha/status/1324416187753660417?s=20

मुंबई-दिल्ली सामन्यातील आकडेवारी

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यास उतरलेल्या मुंबईने २०० धावा उभ्या केल्या. मुंबईकडून क्विंटन डी कॉकने ४०, सुर्यकुमार यादवने ५१, ईशान किशन नाबाद ५५ तर हार्दिक पांड्याने नाबाद ३७ धावा केल्या होत्या. दिल्लीकडून अश्विनने ३ विकेट्स घेतल्या होत्या.

मुंबईच्या २०१ धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ १४३ पर्यंतच पोहोचू शकला होता. यात मार्कस स्टॉयनीसने ६५ तर अक्षर पटेलने ४२ धावांची खेळी केली होती. दिल्लीच्या संघाला १५०च्या आतच रोखण्यात मुंबईच्या गोलंदाजांचे मोठे योगदान होते. मुंबईने ५७ धावांनी सामना जिंकून अंतिम सामन्यात प्रवेश केला.

महत्त्वाच्या बातम्या-

‘दीदी याला आता तूच समजावून सांग,’ पंतच्या बहिणीकडे चाहत्याची अजब मागणी

दुर्दैवच म्हणायचं अन् काय! फ्री हीट असनूही फलंदाज झाला बाद, पाहा कसं

भारतीय क्रिकेटरबरोबर पार्टी करताना दिसली आंद्रे रसेलची पत्नी, हुक्का घेत…

ट्रेंडिंग लेख-

मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ

आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा

‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीबद्दल माहित नसलेल्या १५ गोष्टी!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---