---Advertisement---

PBKS vs RR: ‘हा’ ठरला राजस्थानच्या विजयाचा टर्निंग पाँईंट

---Advertisement---

आयपीएल 2025 मधील 18वा सामना राजस्थान राॅयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने पंजाब किंग्ज संघाचा 50 धावांनी पराभव केला. या विजयासह आरआरने हंगामातील दुसऱ्या विजयाची नोंद केली.

टाॅस गमावून पहिल्या डावात खेळताना राजस्थान राॅयल्सने 20 षटकांत 4 विकेट्स गमावून 205 धावा केल्या, प्रत्युत्तरात पंजाब किंग्जला 20 षटकांत 9 गडी गमावून 155 धावांपर्यंतच पोहोचता आले. राजस्थान राॅयल्सकडून जोफ्रा आर्चरने मॅच विनिंग कामगिरी केली.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाब किंग्जची सुरुवात खुपच खराब झाली. संघाला पहिल्या षटकातच दोन धक्के बसले, जोफ्रा आर्चरने डावाच्या पहिल्या चेंडूवर प्रियांश आर्यला शून्य धावावर बोल्ड केले. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने पुढील तीन चेंडूत जोफ्राला दोन चौकार लगावले, पण जोफ्रा देखील मागे हटला नाही त्याने शेवटच्या चेंडूवर अय्यरला बोल्ड केले. झटपट विकेट गमावल्याने पंजाब बॅकफूटला सरकला. शिवाय संघाने पाॅवरप्लेमध्ये 3 विकेट्स गमावून केवळ 43 धावा केल्या. ज्यात जोफ्रा आर्चरने धारदार गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांत 25 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.

यानंतर नेहल वढेरा (62) व ग्लेन मॅक्सवेल (30) यांनी काही काळ क्रिझवर घालवला. पण ते पंजाबला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---