गुरुवारी (19 डिसेंबर) कोलकाता येथे आयपीएल 2020मधील 13 व्या हंगामासाठीचा लिलाव पार पडला. आयपीएलचा लिलाव पार पडल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आयपीएल 2020चा (IPL 2020) हंगाम 28 मार्चपासून सुरु करण्याच्या विचारात आहे.
त्यामुळे आयपीएल फ्रेंचायझी (Franchise) चिंतेत आहेत. कारण याच दरम्यान दोन मोठ्या आंतरराष्ट्रीय मालिका सुरु असणार आहेत. त्यामुळे काही खेळाडूंना आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकावे लागू शकते.
ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलंड (New Zealand) हे संघ या काळात 3 टी20 सामने खेळणार आहेत. तर इंग्लंड (England) आणि श्रीलंका (Sri Lanka) संघ 2 कसोटी सामने खेळणार आहेत.
एका फ्रेंचायझीच्यावरिष्ठ अधिकाऱ्याने आयएएनएसला सांगितले की, अधिकृत वेळापत्रक अद्याप बाहेर आले नाही. परंतु, त्यांना आशा आहे की, गव्हर्निंग काऊंसिल आपल्या जुन्या आयपीएलच्या प्रकाराप्रमाणे जाईल. ज्यामध्ये डबल हेडर असायचे आणि आयपीएलचा हंगाम 1 एप्रिलच्या आसपास सुरू होत होतो.’
“ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मालिकेचा अंतिम टी20 सामना 29 मार्च रोजी संपेल. तर इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसर्या कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस 31 मार्च आहे. या परिस्थितीत आपण आपल्या मोठ्या खेळाडूविना हंगाम सुरू केला तर ही चांगली गोष्ट होणार नाही,” असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
“जर आम्ही 1 एप्रिलपासून सुरुवात केली, तर गोष्टी अधिक चांगल्या होऊ शकतात. आशा आहे की, आयपीएल गव्हर्निंग काऊंसिल आम्ही काय म्हणतो ते ऐकून घेईल,” असेही अधिकाऱ्याने सांगितले.
लिलावानंतर संध्याकाळी झालेल्या बैठकीत फ्रँचायझीच्या चार अधिकाऱ्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याचे सांगितले.
“ही अशी परिस्थिती आहे जी फ्रँचायझीच्या बाजूने जात नाही आणि चार ते पाच संघांदरम्यानही या विषयावर चर्चा झाली. कोणीही सुरुवात बॅकफूटवर करू इच्छित नाही. परंतु, आपण केवळ आशा बाळगू शकतो. वेळापत्रक येण्यापूर्वी आमच्याकडे अजून काही आठवडे बाकी आहेत. आम्ही अपील करू शकतो,” असे अधिकाऱ्याने सांगितले.
“मागील वर्षी आमचे खेळाडू आयपीएलच्या शेवटच्या सामन्यांमध्ये गेले होते. आता यावेळी आम्ही आमच्या अव्वल खेळाडूंशिवाय हंगाम सुरू करण्याची शक्यता आहे. हंगामाच्या सुरूवातीस आम्हाला चांगली सुरुवात व्हावी आणि चांगली लय मिळावी म्हणून आयपीएलच्या गव्हर्निंग काऊंसिलने यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे,” असे अधिकाऱ्याने सांगितले.
आता आयपीएलचा 2020 चा हंगाम कधी सुरु होतो हे पहावे लागेल.
चायनामन गोलंदाज कुलदीपला आज ही खास सेंचूरी पूर्ण करताच इतिहास घडवण्याची संधी
वाचा- ????https://t.co/aLusGYI1mN????#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi
@MarathiRT #INDvWI #kuldeepyadav— Maha Sports (@Maha_Sports) December 22, 2019
मुंबई इंडियन्सचा मालक आकाश अंबानी म्हणतो, आयपीएलमध्ये ही गोष्ट करणे सर्वात कठीण
वाचा- ????https://t.co/tD8MkmD1oK????#म #मराठी #Cricket #IPL2020Auction @Mazi_Marathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 21, 2019





