Sunday, January 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी ऑस्ट्रेलियान दिग्गज बनला पंजाब किंग्जचा प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आणणार कामी

माजी ऑस्ट्रेलियान दिग्गज बनला पंजाब किंग्जचा प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आणणार कामी

October 20, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: www.iplt20.com

Photo Courtesy: www.iplt20.com


आयपीएलच्या पुढच्या हंगामासाठी (आयपीएल 2023) पंजाब किंग्ज संघाने तयारी सुरू केली आहे. पंजाब किंग्ज आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून या स्पर्धेत खेळत आहे, पण त्यांना अद्याप एकदाही विजेतेपद पटकावता आले नाहीये. यादरम्यान संघाने नवीन सहायक प्रशिक्षकाची देखील नियुक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रॅड हॅडिन पंजाब किंग्जचा नवीन सहायक प्रशिक्षक बनला आहे. 

तत्पूर्वी ट्रेवर बेलिस (Trevor Bayliss) पंजाब किंग्जचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त झाले होते. भारतीय दिग्गज अनिल कुंबळे (Anil Kumble) यांच्या जागी बेलिसने ही जबाबदारी स्वीकारली होती. माध्यमांशी बोलताना पंजाब किंग्जच्या विश्वसनीय सुत्रांनी सांगितले की, हॅडिनला संघाचा सहायक प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले गेले आहे. उर्वरित सपोर्ट स्टाफही लवकरच नियुक्त केला जाईल, असेही या सूत्राकडून सांगितले गेले. संघाचा नवीन सहायक प्रशिक्षक ब्रॅड हॅडिन (Brad Haddin) ऑस्ट्रेलियन संघासाठी 66 कसोटी, 126 एकदिवसीय आणि 34 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

काही दिवसांपूर्वी जेव्हा अनिल कुंबळे यांना पंजाबच्या मुख्य प्रशिक्षकदावरून हटवले गेले, तेव्हा संघाच्या सपोर्ट स्टाफमधील इतर सर्वांना देखील स्वतःच्या जबाबदारीतून मुक्त केले गेले होते. दक्षिण आफ्रिदी दिग्गज जॉन्टी रोड्स त्यावेळी संघाचे सहायक प्रशिक्षक होते. त्याव्यतिरिक्त डॅमियन रॉइट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहत होते. रोड्स आयपीएल 2020 हंगामाच्या आधीपासून पंजाब किंग्ज संघासोबत होते.

पंजाब किंग्ज ट्रेवर बेलिस यांच्या मार्गदर्शनात आगामी हंगामात विजेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नात असेल. संघाला नवीन प्रसिक्षकांकडून खूप अपेक्षा आहेत. यापूर्वी बेलिसच्या मार्गदर्शनात कोलकाता नाइट रायडर्सने  2012 आणि 2014 मध्ये विजेतेपद पटकावले होते. पंजाब किंग्जचे आयपीएलमधील आतापर्यंतचे प्रदर्शन पाहिले, तर ते निराशाजनक म्हणता येऊ शकते. मागच्या चार हंगामांपासून संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर राहिला आहे. यावर्षी मात्र मयंक अगरवाच्या नेतृत्वातील संघावर विजेतेपद पटकावण्याचे दबाव वाढला आहे. पंजाब किंग्जचा संघ नेहमीच दिग्गज खेळाडूंनी भरलेला राहिला आहे, जे एकट्याच्या जोरावर संघाला विजय मिळवून देऊ शकतात. पण अद्याप संघाला एकही आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नाहीये. यावर्षी संघात अजून काही गुणवंत खेळाडूंचा समावेश होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
डिसेंबरमध्ये बांगलादेश दौरा करणार भारतीय संघ, जाणून घ्या वनडे आणि कसोटी मालिकेचे वेळापत्रक
कार्तिक आणि पंत दोघेही संघात खेळू शकतात! गावसकरांनी समजावले प्लेइंग इलेव्हनचे गणित 


Next Post
ishan kishan

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत इशान किशनने दाखवला जलवा, ठोकलं वादळी शतक

Hardik-Pandya

नादच खुळा! पाठीच्या दुखापतीतून बाहेर येण्यात पंड्याच्या कुटुंबाने निभावली मोठी भूमिका, स्वत:च केला खुलासा

David Wiese

नामिबिया विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर डेविड विसेला अश्रू अनावर, विरोधी खेळाडूंच्या 'या' कृतीने जिंकले मन

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143